Buldana Samruddhi Mahamarg Accident : आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले अपघाताचे ‘हे’ कारण !

Nagpur : नागपूरसह विदर्भात या अपघाताची कारणे शोधली जात आहेत.
Accidental bus
Accidental busSarkarnama

Vidarbha Travels bus met an accident : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा आज (ता. १ जुलै) पहाटे दीड वाजताच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर नागपूरसह विदर्भात या अपघाताची कारणे शोधली जात आहेत. चौकाचौकांत, घराघरांत अपघाताचीच चर्चा आहे. विविध तर्क वितर्कही लावले जात आहेत. (Transport department officials discuss with the passengers who survived the accident)

अपघातातून (Accident) वाचलेल्या प्रवाशांसोबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा आणि चौकशी करून या अपघाताचे कारण स्पष्ट केले आहे. अमरावती (Amravati) परिवहन विभागाचे अधिकारी राजाभाऊ गीते यांच्याकडून जारी केलेल्या अहवालानुसार, सर्वप्रथम रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या स्टीलच्या पोलला बस धडकली. चालकाचे सदर बस वरील नियंत्रण सुटले व बस पुन्हा रस्त्याच्या दुभाजकास भिडली.

धडकेची तीव्रता जात होती. त्यामुळे बसचा समोरचा सांधा चेचीसपासून निखळला गेला. त्यामुळे पुन्हा या बसची उजवी बाजू रस्ता दुभाजकास जेथे डिझेलची टाकी होती, अशा ठिकाणी धडकली. ज्यामुळे बसची संपूर्ण बॉडी कापली गेली, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

घर्षणामुळे उष्णता निर्माण होऊन लागली आग..

समोरचे एक्सेल निखळल्यानंतर बसची समोरची बाजू सिमेंटच्या रस्त्यावर आदळली आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होऊन आग लागली. बस चालत असल्यामुळे इंजीन ऑईल अधिक गरम झाले होते. असाही अंदाज अहवालात नमूद करण्यात आला आहे.

Accidental bus
Buldana Samruddhi Mahamarg Accident : मृतांमध्ये नागपूर, वर्ध्याच्या १२ जणांचा समावेश, डीएनए टेस्टींगनंतर पटणार मृतांची ओळख !

बस डाव्या बाजूने उलटली. उजव्या बाजूच्या पुढील एक्सेलवर धडकली असल्यामुळे रस्त्यावर एक्सेलविना घासत गेली. त्यामुळे जास्त प्रमाणात उष्णता निर्माण झाली व त्यामुळे बसला आग लागली. बस डाव्या बाजूला उलटल्यामुळे प्रवाशांना येणे जाणे करणारी मार्गिका बंद झाली व उलटण्यामुळे बसच्या बॉडीचे संतुलन बिघडले व आपातकालीन दरवाजा निष्क्रिय झाला.

टायर फुटल्याने नाही झाला अपघात..

टायर फुटल्यामुळे अपघात झाला ही बाब अपघाताचे कारण नाही. टायर फुटल्यामुळे कुठल्याही पुरावा आढळून आला नाही. नंतर घटनास्थळावर वरचे तुकडे टायरचे रस्त्यावरील निशाण उजव्या बाजूला वाकलेले दिसले. बसचा वेग हेसुद्धा मागचे कारण दिसून येत नाही.

Accidental bus
Buldana Samruddhi Mahamarg Accident : ‘समृद्धी’वर धावत्या बसचे टायर निघाले, द बर्निंग बसचा थरार, २५ जणांचा कोळसा !

समृद्धी महामार्गावर ही बस १ वाजून ८ मिनिटांनी मार्गस्थ झाली आणि अपघात १ वाजून ३२ मिनिटांनी झाला. अपघाताचे ठिकाण १५२ किलोमीटर या महामार्गावर प्रवेश केल्यानंतर दूर होते. याचा अर्थ बस ने १५२ किलोमीटर अंतर २ तास २४ मिनिटात पार केले होते. या बसचा वेग ताशी ७० किलोमीटर एवढाच होता. असे दिसून येते. आरटीओ (RTO) विभागाचे अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com