Rahul Narvekar Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राहुल नार्वेकरांचं मोठं भाष्य; म्हणाले, आदेशाची...

Shivsena Thackeray Group News : चार महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील नार्वेकरांकडून काही कारवाई करण्यात आली नसल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

Ganesh Thombare

Delhi News : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. याचवेळी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काही महत्त्वाचे आदेशही दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आता राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया देताना मोठं भाष्य केलं आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर निर्णय घेण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली होती. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील नार्वेकरांकडून काही कारवाई करण्यात आली नसल्याने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर कारवाईबाबत किती वेळात निर्णय घेणार, असा सवाल केला.

या वेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच दोन आठवड्यांनंतर या प्रकरणाची सर्व माहिती सुप्रीम कोर्टात द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेत.

सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं भाष्य केलं असून, कोर्टाच्या निर्देशाची अद्याप माझ्यापर्यंत कोणतीही माहिती आलेली नाही. सुप्रीम कोर्टात झालेल्या ऑर्डरसंदर्भात सविस्तर माहिती मी घेईल. त्यानंतर पुढच्या कारवाईबद्दल मी पुढचा निर्णय घेईल, असे नार्वेकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT