Supreme Court Hearing : सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले; ‘अपात्रता कारवाईबाबत किती वेळात निर्णय घेणार, त्याचं टाइम टेबल द्या’

Shivsena Thackeray Group News : विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.
Supreme Court Hearing
Supreme Court HearingSarkarnama

New Delhi : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी आम्ही तीन महिन्यांची डेडलाइन ठेवली नाही. पण, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. ते असं अनिश्चित काळ काम करू शकत नाहीत. किती वेळात काम करणार याचं टाइम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावे, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. ('Give time table of when to take a decision on disqualification' : Chief Justice Dhananjay Chandrachud)

विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईविरोधात दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत आहेत, असा आरोप ठेवून ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखली केली आहे. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नार्वेकर यांच्या वकिलांना स्पष्ट शब्दांत ताकीद दिली.

Supreme Court Hearing
Bacchu Kadu On Guwahati: ....नाही तर मी गाडीतून उतरतो; बच्चू कडूंनी दिली होती एकनाथ शिंदेंना धमकी

ठाकरे गटाच्या वतीने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शिवसेनेकडून युक्तिवाद केला. ॲड. सिब्बल म्हणाले की, ता. १८ सप्टेंबरला जेव्हा न्यायालयाची तारीख जवळ आली, त्याच्या आधी 4 दिवस फक्त दिखावा म्हणून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी ठेवली होती.

Supreme Court Hearing
PM Modi's Sansad Speech : संसदेच्या कामात आतापर्यंत तब्बल ७५०० लोकप्रतिनिधींनी योगदान दिले; जुन्या संसदेच्या आठवणीत मोदी रममाण

आमदारांना अपात्र करण्याच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना ‘ट्रिब्युनल’ म्हणून काम करायचं आहे. सभागृहाचे अध्यक्ष म्हणून नाही. जुलै 2022 मध्ये या प्रकरणावर उत्तर द्यायचं होतं, त्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये दिलं. आता कागदपत्रांचे कारण पुढे करत आहेत. तुम्ही याबाबत काही निर्देश द्यावेत, अशी विनंती ॲड. कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली.

सिब्बल यांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्ही तीन महिन्यांची डेडलाइन ठेवली नाही. पण, अध्यक्षांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असा इशारा सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावणीदरम्यान दिला.

Supreme Court Hearing
PM Modi Special Session : नेहरूंपासून मनमोहनसिंगांपर्यंतच्या पंतप्रधानांचे मोदींनी केले कौतुक...

येत्या दोन आठवड्यांत विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईच्या विरोधात पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात अपात्रतेच्या कारवाईबाबत काय प्रगती झाली, हे विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला सांगावं. ते असं अनिश्चित काळ काम करू शकत नाहीत, किती वेळात काम करणार, याचं टाइम टेबल त्यांनी द्यावे, असेही चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले.

Supreme Court Hearing
Mahadev Jankar on BJP : मला मंत्री करून भाजपवाल्यांनी उपकार केले नाहीत; महादेव जानकरांचा सणसणीत टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com