Mumbai Political News : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज (२० ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर, आजची सुनावणी पार पडल्यानंतर दुपारी चार वाजता राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना होतील. दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुनावणीच्या नव्या वेळापत्रकाबाबत चर्चा करतील, अशी माहिती आहे.
१२ ऑक्टोबरला आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी झाली होती. सर्व याचिका एकत्रित करून घ्याव्यात, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती, तर प्रत्येक आमदाराचे म्हणणे वेगवेगळे असल्याने स्वतंत्र सुनावणी घ्यावी, असा मुद्दा शिंदे गटाने मांडला होता. या वेळी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले. त्यामुळे नार्वेकर शुक्रवारी याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांना आमदारांच्या सुनावणीसंदर्भात नव्याने वेळापत्रक सादर करण्याचेही आदेश दिले. त्यामुळे आजची सुनावणी पार पडल्यानंतर नार्वेकर हे दिल्लीला जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेऊन ते सुधारित वेळापत्रकासंदर्भात चर्चा करतील. त्यासोबतच याबाबत काही जणांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त करत त्यांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे, तर ३० ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर न केल्यास आम्ही दिलेले वेळापत्रक स्वीकारावे लागेल, असा इशाराही न्यायालयाने दिला. त्यामुळे नार्वेकर ॲक्शन मोडवर आले असून, आजच्या सुनावणीनंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.