Rahul Narwekar Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar : आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वीच नार्वेकरांचं मोठं विधान : म्हणाले, 'मी कुणाच्याही दबावाला...'

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री असूनही त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जातात.

Sunil Balasaheb Dhumal

Shivsena MLA Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षावर बुधवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून नार्वेकरांवर सेटलमेंटचा गंभीर आरोप केला जात आहे.

यावर नार्वेकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला विधानसभाध्यक्षांच्या कामकाजाची माहिती असते. मात्र हेतूपुरस्पर ते बिनबुडाचे आरोप करीत असल्याची टीका नार्वेकरांनी ठाकरेंवर केली आहे.

राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, विधानसभाध्यक्ष कोणत्या कारणाने मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना हवी. मात्र तरीही आरोप करीत असतील तर त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. विधानसभाध्यक्ष असलो तरी मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातील कामाबाबत भेटू शकतो, असेही नार्वेकरांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच भेट लांबल्याचे कारणाही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत नेमकी चर्चा काय ?

'मुख्यमंत्र्यांसोबत माझी 3 जानेवारी रोजी बैठक होणार होती. मात्र आजारी असल्याने ती बैठक लांबली. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तातडीने भेट घेतली. विधिमंडळातील काही प्रश्नांबाबत चर्चा केली. कुलाबा-नरिमन पॉईंट येथील काही कामांबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडला. दक्षिण मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण थांबले आहे. ते काम सुरू करण्याची मागणी केली. विधिमंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीबाबतही चर्चा केली. मात्र जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना विधिमंडळाचे कामकाज माहिती आहे, त्यांनीच असे बिनबुडाचे आरोप केले तर त्यांचा हेतू काय आहे, हे आपल्याला समजले असेल,' अशी टीका नार्वेकरांनी नाव न घेता ठाकरेंवर केली.

'दरम्यान, मी आज सकाळी मुंबई विमानतळावर जयंत पाटील आणि अनिल देसाईंना भेटलो, मग ती भेट जाणिवपूर्वक होती का? कामानिमित्त सर्वजण मला येऊन भेटतात. मग त्यांना भेटायचे नाही का ? आता काही कारणाने मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो किंवा विधिमंडळांच्या सदस्यांनी माझी भेट घेतली तर त्यांना भेटायचे नाही का ?' असे प्रश्नही नार्वेकरांनी उपस्थित केले.

उद्धव ठाकरेंना सुनावले...

'ज्यावेळी बिनबुडाचे आरोप होतात, त्यावेळी केवळ निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर दबाब किंवा प्रभाव टाकण्यासाठी केले जातात. मात्र मी तुम्हाला आश्वासित करतो, की जो निर्णय घेणार आहे तो संविधानातील तरतुदीनुसार असेल. 1986 चे नियम आहेत, त्याआधावर निर्णय घेईल. तसेच विधिमंडळाचे पायंडे आहेत, याचा विचार करूनच निर्णय घेईल. त्यामुळे राज्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. कोर्टात जायचा अधिकार सर्वांना आहे. कुणी काहीही बोलले तरी त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही,' असे ठणकावत नार्वेकरांनी 'निकाल दिलेल्या वेळमर्यादेतच घेणार, असेही स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT