Rahul Narwekar : बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसते; नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

Maharashtra Politics : पक्षांतर बंदी कायद्यावर निर्णय घेण्यास सक्षम
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Konkan Political News : सत्तासंघर्षावरील निकाल लांबणीवर टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. यातच खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकार ३१ डिसेंबरपर्यंत पडणार असल्याचा दावा केला आहे. यानंतर सत्ताधारी शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राऊत आणि ठाकरेंना लगावले आहेत.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले नार्वेकर म्हणाले, सरकार पडायचे असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडते. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडते. बाहेर कोण, काय बोलतोय म्हणून सरकार पडत नसते. या सरकारने बहुमताचा आकडा सभागृहात पार केला आहे. संख्याबळाच्या जोरावर या सरकारने बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. संविधान दिनीच उगाचच कोणीतरी असंवैधानिक विधाने करू नयेत, असा टोला त्यानी संजय राऊत यांना सरकार पडण्याच्या वक्तव्यावर लगावला आहे.

Rahul Narwekar
Thackeray Group : ठाकरे गटानं दहा नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी; लोकसभेसाठी मोर्चेबांधणी

आदित्य ठाकरेंनी सरकार पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना नार्वेकरांनी याबाबतचा निर्णय त्यांनी नाही तर विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे, असे म्हणत खडेबोल सुनावले. नार्वेकर म्हणाले, पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर निश्चितच सक्षम विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईन. त्यामुळे उगाच पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लंघन झाले, अशा प्रकारचे विधान आदित्य ठाकरेंनी करू नयेत. महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासीत करतो की कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावे, असेही राहुल नार्वेकरांनी सांगितले.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?

आदित्य यांनी या 31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच, असा दावा कोकण दौऱ्यावर असताना केला होता. 'राज्यातील सत्तासंघर्षावर सध्या सुनावणी सुरू आहे. अध्यक्ष मोहदयांकडे जे ट्रिब्यूनल म्हणून काम करत आहेत, त्यांनी संविधानानुसार घटनाबाह्य सरकार पाडून एकतर निवडणूका जाहीर करणे किंवा यांना बाद करणं अपेक्षित आहे. तर आणि तरच राज्यात लोकशाही जीवंत राहील,' असेही ठाकरे म्हणाले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Rahul Narwekar
MLA Nilesh Lanke : मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर लंके पोहाेचले शेतकऱ्यांच्या बांधांवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com