Thane Political News : नव्या वर्षात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट ठाणे जिल्ह्याकडे मोर्चा वळवत, आगामी विधानसभेसाठी 'मिशन' ठाण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. ठाणे धरणाचा जिल्हा असतानाही येथील नागरिक नेहमीच तहानलेले असतात. त्यांना पाण्यासाठी हजारो मैल पायपीट करावी लागते. तीच पायपीट थांबवण्यासाठी अजित पवारांनी पाणी समस्या कायमस्वरूपी मार्ग लावण्याचे आश्वासन दिले आहे.
पाण्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (भाई) Eknath Shinde यांना त्यांच्याच बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (दादा) यांनी जाहीरपणे आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाण्यात भाई विरुद्ध दादा आमने-सामने येणार काय ? ठाणेकर भाईगिरीवर पुणेरी दादागिरी किती भारी पडणार का, हेच पाहावे लागणार आहे.
2024 हे वर्ष महाराष्ट्रात निवडणुकीचे वर्ष ठरणार आहे, तर राज्यातील सत्तेच्या गणितासाठी राजकीय भूकंप झाले आहेत. यामध्ये ठाण्याचे भाई आणि पुणेरी दादांची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. भाई राज्याचे मुख्यमंत्री, तर दादा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यातच दोघांना त्यांचे-त्यांचे पक्ष वाढविण्याचे मोठे आव्हान आहे. तर, नवीन वर्षात दादांनी थेट भाईंच्या बालेकिल्ल्याकडेच लक्ष केंद्रित केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादांनी ठाणे जिल्ह्यात पहिला कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या शैलीत आणि शासकीय योजनांचा अभ्यासातून ठाण्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांची नस ओळखून त्यांना घेरले. त्यातून दादांनी पाण्याची गरज लक्षात घेत, एक नाही दोन धरण उभारण्याचे आश्वासन दिले आहे.
याशिवाय अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना, लोकसभेत नाही, पण विधानसभेसाठी ताकद वाढवा असे बजावले आहे. यावरून ठाणे जिल्ह्यात दादांनी भाजपप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात बुद्धिबळाच्या पटलावर फासे टाकण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
भाई मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच त्या कामांसाठी निधी ही अपुरा पडणार नाही, याची दक्षता ते घेत आहेत. एकीकडे विकासकामे सुरू असताना, दुसरीकडे दादा आपल्या प्रशासकीय अभ्यासाच्या जोरावर दादांनी भाईंना घेण्याचे काम सुरू केले आहे. अशा प्रकारे दादा टक्कर देतील, हे तितकेच खरे असले तरी आगामी काळात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारेल, हेच पाहावे लागणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.