Shrikant Shinde, Raj Thackeray, Naresh Mhaske Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंनी पुन्हा घातला परप्रांतियांच्या मुद्द्याला हात; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंना मोठा सल्ला

Lok Sabha Election 2024 : आपली शहरे सुधारण्यासाठी आपण निवडणुका घेतो. मात्र या मूळ मुद्द्याकडे कोणाचेच लक्ष नाही. आताच्या निवडणुकीत कोणताच मुद्दा नसल्याने सर्व नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

Sunil Balasaheb Dhumal

Thane Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यापूर्वी परप्रांतियांच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापवले होते. लोकसभा निवडणुकीनिमित्त ठाण्यात बाहेरुन येणाऱ्या लोकांचा मुद्दा उपस्थित करत राज यांनी कल्याणचे श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांना हे लोंढे थांबवण्यासाठी संसंदेत काम करण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे Shrikant Shinde हे कल्याण तर नरेश म्हस्के ठाणे मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या संयुक्त प्रचारार्थ कळव्यातील खारगाव येथे राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी त्यांनी जुन्या ठाण्याच्या आठवणींना उजाळा दिला. तर आता ठाणे बकाल होण्यास वाढती लोकसंख्या कारणीभूत असल्याकडे लक्ष वेधून परप्रांतीयांचा मु्द्दा पुढे केला.

राज ठाकरे Raj Thackeray म्हणाले, आनंद मठात गेल्यानंतर सर्व जुने दिवस आठवले. माझे आणि आनंद दिघेंचे वेगळे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्यासोबत ठाणे फिरताना आनंद मिळत होता. त्यावेळी आचारसंहिता असले काही नसायचे. रात्री बारा वाजेपर्यंत भाषणे होत होती. त्यावेळचे ठाणे टुमदार होते. ठाण्याची तलावांचे शहर म्हणून ओळख होती. आता टँकरचे शहर झाले आहे. ही बाब 30-35 वर्षांपूर्वीचे होते. आता तशी शहरे उभी राहिले पाहिजे.

ठाणे हे कसेही वाढले असून त्याला बाहेरून येणारे लोक कारणीभूत असल्याची टीका ठाकरेंनी केली. ते म्हणाले, अनेक वर्षांपासून सांगतोय की इतर राज्यातून ठाण्यात येणारे लोंढे थांबवा. बाहेरून येणारे हे लोक थांबत नाही तोपर्यंत सिंमेंटची जंगले वाढतच राहणार. मग तुम्ही कितीही विकासाच्या गप्पा करा, हे शहर बकालच राहणार. येणारे लोक थांबत नाहीत तोपर्यंत येथे काहीही घडू शकणार नाही, असेही त्यांनी मत व्यक्त केले.

ठाण्यात येणाऱ्या लोकांचे प्रमाण जगात सर्वात जास्त असल्याचेही ठाकरेंनी सांगितले. लोकसंख्येनुसार महानगरपालिका ठरते. राज्यात प्रत्येक जिल्ह्याला एक किंवा दोन महानगरपालिका आहेत. ठाण्यात मात्र तब्बल सात महानगरपालिका आहेत. ठाण्यातील ही लोकसंख्या स्थानिक लोकांनी वाढवली नाही, असेही ठाकरे म्हणाले.

आपली शहरे सुधारण्यासाठी आपण निवडणुका घेतो. मात्र या मूळ मुद्द्याकडे कोणाचेच लक्ष नाही. एका जिल्ह्यात किती महानगर पालिका होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता तुम्हाला एकच सांगणे आहे, असे म्हणत श्रीकांत शिंदे Shrikant Shinde आणि नरेश म्हस्के यांच्याकडून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ठाण्यात येणारे लोकांचे लोंढे आवरा. संसदेत हेच प्रश्न मांडा. हे थांबले पाहिजे, अशी अपेक्षाही ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT