Mumbai News : राज्याचं राजकारण गेले महिना-दीड महिना राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या भोवती फिरत आहे. महायुती सरकारचा हिंदीसक्तीचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाचा ठरला. हे दोन्ही नेते येत्या 5 जुलै रोजी विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची धडाडती तोफ असलेल्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
माजी मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेना-मनसे एकत्र आल्यास राज ठाकरेंचा राजकीय बळी जाणार असल्याचं विधान केलं आहे. आपण उद्धव ठाकरेंना जवळून पाहिलं असून राज यांनी यापूर्वी त्यांना एकत्रित येण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. मात्र, उद्धव यांनी त्यावेळी एका म्यानात दोन तलवार राहणार नसल्याचं स्पष्ट करत हा तो फेटाळल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राज ठाकरे यांनी आदित्यला निवडून दिले, पण उद्धव यांनी हे पथ्य पाळले का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं राज ठाकरेंना (Raj Thackeray) निमंत्रण दिलं, मात्र व्यासपीठावर बसायला जागा दिली नव्हती. मी उठून बसायला जागा दिली होती.त्यांनी राज यांना अपमान करण्यासाठी बोलावलं होतं का?,असा सवालही कदम यांनी उपस्थित केला आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन केला होता,असा खळबळजनक दावा केला आहे.ते म्हणाले,कणकवलीला जातांना आम्हाला रास्ता बदलावा लागला. एसपीने मुंबईत परतण्यास सांगितले होते.हे सगळं राज ठाकरेंना विचारा,असंही कदम यांनी सांगितलं.
महाबळेश्वरमध्ये उद्धव ऐवजी राज यांची शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली असती तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता,असा दावाही रामदास कदम यांनी केला आहे.ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. तसेच याचवेळी त्यांनी मातोश्रीतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही,तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते असंही सांगितलं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर रामदास कदम म्हणाले,उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडले, राज यांच्या मुलाला पाडलं, तेव्हा मराठी माणसाचं हित कुठं गेलं होतं? असा सवाल विचारतानात त्यांनी राज आपले चांगले मित्र असल्याचंही म्हटलं.
यावेळी शिवसेनेच्या रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मी, दिवाकर रावते,लीलाधर ढाकेंसारख्या लोकांना वापरून घेऊन सोडून दिले. आमची आमदारकी,मंत्रिपदं काढून घेतली.उद्धव ठाकरे हे माणसांचा वापर करुन घेतात असा हल्लाबोलही कदम यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.