Raj Thackeray 
मुंबई

Raj Thackeray: समुंदर मे 'डुबे डुबे' कर मारेंगे! राज ठाकरेंनी भाजप खासदाराला दिलं थेट चॅलेंज; म्हणाले, मुंबईत येऊन दाखव...

Raj Thackeray Mira Road Speech: मीरा-भाईंदर इथल्या मीरा रोडला राज ठाकरेंची यांची जाहीर सभा पार पडली, यावेळी त्यांनी हिंदी न्यूज चॅनेल आणि खासदार निशिकांत दुबे यांना सडेतोड उत्तर दिलं.

Amit Ujagare

Raj Thackeray Mira Road Speech: मराठी-हिंदी भाषेचा वाद महाराष्ट्रात सुरु झाल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल आणि राज-उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चिथावणीखोर विधान केलं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आज त्यांनी जाहीर सभेत खासदार दुबे यांना चांगलच झोडपून काढलं.

खासदार दुबेंना दिलं प्रत्युत्तर

त्या दिवशी तो कोणीतरी भाजपचा खासदार दुबे नावाचा. काय बोलला? मराठी लोगोंको हम यहां पर पटक पटक कर मारेंगे. झाली का केस त्यांच्यावर, हिंदी चॅनेलनं हे पुढे चालवलं का? बघा कसं असतं हे. तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे...दुबेलाच मी सांगतो दुबे! तुम मुंबई मे आ जाओ. मुंबई के समुंदर मे 'दुबे दुबे'कर मारेंगे. यांना कशी हिंमत होते बघा. तुम्ही अमराठी लोकांवर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. पण हे लोक बोलले तर त्यांना माहिती आहे, की सरकार आमच्या पाठिशी आहे. सरकारच जर या गोष्टी इथं लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे.

आमची सत्ता रस्त्यावर आहे

एक गोष्ट तुम्हाला सांगतो की, तुमची सत्ता असेल तरी विधानसभेत आणि लोकसभेत आमची सत्ता इथं रस्त्यावर आहे. काही नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत जर कोणी महाराष्ट्रात वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि यांचा हात यांची सर्वांची युती झाल्याशिवाय राहणार नाही.

कसली स्क्रीप्ट आहे?

फडणवीसांची ही स्क्रीप्ट आहे असं जे पत्रकार सांगतात. पण हा कोणता स्क्रीप्ट रायटर आहे जो स्वतःचा अपमान पण त्यामध्ये लिहितो. सगळ्यांकडून दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जीआर मागे घेतो हे कोणी स्क्रीप्ट रायटर लिहितो? पण हे काय सुरु आहे? आतून यांचं सगळं एकच आहे हे सांगत तुमच्या मनात विष कालवण सुरु आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मराठी माणसाच्याबाबतीत, मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशीही तडजोड करणार नाही. याची आधी केली नाही, आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही. तुम्ही देखील महाराष्ट्रात असंच राहीलं पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT