BJP Politics: भाजपला हवीत 80 टक्के बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मतं! कार्यकर्त्यांना दिलं नवं टार्गेट

BJP Politics Nagpur Mahapalika Election: लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा अपेक्षित टक्का भाजपला गाठता आला नव्हता.
BJP State President Ravindra Chavan
BJP State President Ravindra Chavan Sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics Nagpur Mahapalika Election: लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा अपेक्षित टक्का भाजपला गाठता आला नव्हता. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासारखा वजनदार आणि लोकप्रिय नेता असतानाही काँग्रेसनं त्यांना प्रचार यात्रा काढण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतरही मागील निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्यात घट झाली होती. ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. हे बघता आता भाजपनं नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकण्यासोबतच कार्यकर्त्यांना नवं टार्गेट दिलं आहे. यानुसार शहरातील ८० टक्के बूथवर ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान मिळवण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

BJP State President Ravindra Chavan
Maharashtra Minister Honey Trap: "सगळे मंत्री एकमेकांकडं पाहून राहिले..."; 'हनी ट्रॅप'च्या मुद्द्यावर फडणवीस सभागृहात नेमकं काय म्हणाले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या आढाव्याची बैठक बोलावली होती. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह महामंत्री राजेश पांडे, माधवी नाईक, रणजित सावरकर, विक्रांत पाटील, रवींद्र अनसपुरे तसेच संगठन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, कार्यालय प्रमुख संजय फांजे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. यात प्रारंभी सर्व मंडळांची कार्यकारिणी, बूथ समिती, पेज प्रमुखांची रचना, प्रत्येक तीन बुथवर शक्ती केंद्र प्रमुखांच्या रचनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी लोकांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना पोचवण्याचे सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले.

BJP State President Ravindra Chavan
Non Grant Teachers: विनाअनुदानित शिक्षकांसाठी खूशखबर! येत्या 1 ऑगस्ट पासून खात्यात अनुदान होणार जमा; सरकारची घोषणा

८० टक्के मतदान केंद्रावर भाजपला सरासरी ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान मिळवण्याचे प्रयत्न करावे असंही यावेळी सांगण्यात आलं. प्रदेशाध्यक्षांनी सर्व जिल्हा प्रमुख व मंडळ प्रमुखांच्या अध्यक्षांना सोनेरी फ्रेममध्ये नियुक्तीपत्र प्रदान केलं. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासोबत या बैठकीला नागपूरमधून अनिल मानापुरे, विनोद शिंदे, श्याम चांदेकर, दिलीप दिवे, संजय कुमार बालपांडे, ईश्वर ढेंगडे, ओमप्रकाश इंगळे, सुधीर कपूर, सतीश सिरसवान आदी उपस्थित होते.

BJP State President Ravindra Chavan
Vidhan Bhavan Hussle: ...तर सदस्यत्व होणार रद्द! राहुल नार्वेकरांनी दिले संकेत; मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालावर केलं महत्वाचं भाष्य

नागपूर महापालिकेत भाजपचे १०८ नगरसेवक यापूर्वीच्या निवडणुकीत निवडून आले होते. यावेळी भाजपने १३० नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट ठेवलं आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. नागपूर शहरात चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. उत्तर नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात भाजपने चांगली मते घेतली असली तरी आमदार निवडून आणता आला नाही. पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा थोडक्यात पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com