Raj Thackeray meets Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "विचारांशी बेईमानी..."; राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray meets Eknath Shinde : मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता या दोन नेत्यांच्या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 19 Feb : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता.१८) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

कारण नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसे एकमेकांविरोधात लढले होते. महत्त्वांचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत युतीत होते. त्यामुळे राज यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

अशातच आता राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी राज आणि शिंदेंच्या भेटीवर प्रश्न विचारताच संजय राऊत म्हणाले, "ते का भेटले हे तुम्ही राज ठाकरेंना विचारा आम्ही त्यांची हेरगिरी करत नाही.

कोण कुणाला भेटतं त्यावर बंधनं नाही. एकनाथ शिंदे या प्रवृत्तीवरून आमचं टोकाचं भांडण आहे. कारण शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विचार आहे. शिंदेंचं हे नंदनवन बेईमानीतून निर्माण झालेलं आहे."

दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली.

तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात लावलेल्या मुंबईतील जुन्या हेरिटेज वास्तूंच्या फोटो फ्रेम्सची त्यांनी बारकाईने पाहणी केली, आणि जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा दिला.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT