Pune ZP Politics : पुण्यात भाजप अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुळशी पॅटर्न ! मांडेकरांना रोखण्यासाठी थोपट्यांची खेळी

Mulshi BJP NCP Sharad pawar alliance : भोर राजगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघातील काही पंचायत समितींमध्ये पेच निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. भोर पंचायत समितीमध्ये सामना बरोबरीत सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तेचे समीकरण कशा पद्धतीने जुळवलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Shankar Mandekar, Sangram Thopte
Shankar Mandekar, Sangram Thopte Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 19 Feb : नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर आता सभापती, उपसभापती आणि अध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील पक्षीय बलानुसार काही ठिकाणी भाजप तर बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे.

मात्र भोर राजगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघातील काही पंचायत समितींमध्ये पेच निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. भोर पंचायत समितीमध्ये सामना बरोबरीत सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तेचे समीकरण कशा पद्धतीने जुळवलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तर दुसरीकडे मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 3 जागांपैकी 2 जागांवर राष्टवादी काँग्रेसने विजय मिळविला. तर एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला. पंचायत समितीत 6 पैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला , तर 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या आहेत. भाजपला 1 जागेवर समाधान मानावे लागले.

Shankar Mandekar, Sangram Thopte
NCERT Map Controversy : राजपूतांच्या दबावामुळे मराठ्यांच्या इतिहासाशी छेडछाड; आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा 'तो' नकाशा हटवला

असं असताना देखील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांना शह देण्यासाठी माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे यांनी रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांना सोबत घेऊन मैदान मारण्याची तयारी थोपट्यांनी केली असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेसाठीचा मुळशी पॅटर्न या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपकडून मुळशी मधील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार समारंभ मान येथे आयोजित करण्यात आला होता. त्याच समारंभाला भाजप व शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी उपस्थित लावली. माजी आमदार सखाराम थोपटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीचाच सभापती होणार अशी घोषणा केली जात असताना दुसरीकडे मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत संग्राम थोपटे यांनी देखील संकेत दिले आहेत.

Shankar Mandekar, Sangram Thopte
Galgotias University : चीनचा रोबोडॉग आम्हीच बनवला सांगणाऱ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीचा आणखी एक खोटारडेपणा उघड, 'तो' ड्रोनही दक्षिण कोरियाचा...

मान येथील समारंभा नंतर बोलताना संग्राम थोपटे म्हणाले, भाजपला 1 शरद पवारांच्या पक्षाला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 अशा जागा मुळशी पंचायत समितीमध्ये निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालेले नाही. त्यामुळे एकत्रित येऊनच या ठिकाणी सत्ता स्थापन करणे आवश्यक असणार आहे.

त्यामुळे सध्या तरी आमचं ठरलं आहे एवढंच मी सांगू शकतो असं म्हणत थोपट्यांनी शरद पवारांच्या सदस्यांना घेऊन सत्ताचे गणित आखले असल्याचे संकेत दिले आहेत. थोपटे यांच्या या संकेतामुळे मुळशी मध्ये वेगळा पॅटर्न बघायला मिळणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आमदार शंकर मांडेकर कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com