Ladki Bahin Scheme : एक झटक्यात 86 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आता शेवटची संधी; जाणून घ्या काय करायचे?

86 Lakh Women Ineligible : महिलांनी 31 मार्चपूर्वीआपल्या चूक दुरुस्त करून पुन्हा केवायसी करावी. त्यामुळे लाडक्या बहिण योजनेचे मानधन पुन्हा सुरू होईल.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Scheme News : महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. मात्र, आता या योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. 2 कोटीं 40 लाख लाभार्थी असणाऱ्या या योजनेतून 86 लाख लाडक्या बहि‍णींची घट झाली आहे. तांत्रिक चूक आणि कठोर छाननीमुळे या योजनेसाठी केवळ एक कोटी 60 लाख महिला पात्र ठरल्या आहेत.

86 लाख महिलांना अपात्र ठरवल्याने मोठा अंसतोष आहे. त्यामुळे अपात्र महिलांसाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांनी केवायसी करताना तांत्रिक चूका झाल्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना 31 मार्चपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे महिलांनी 31 मार्चपूर्वीआपल्या चूक दुरुस्त करून पुन्हा केवायसी करावी. त्यामुळे लाडक्या बहिण योजनेचे मानधन पुन्हा सुरू होईल. दरम्यान, निधीच्या तुटवड्यामुळे लाडक्या बहिणींचे जानेवारीचे मानधन रखडल्या सांगितले जात आहे.

Ladki Bahin Yojana
BJP Vs Shivsena : भाजप-शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये तणाव! अंकुश कदमांच्या बॅनरनंतर नाईक समर्थक संतप्त

E-KYC दुरुस्तीची संधी!

ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले होते.

Ladki Bahin Yojana
Naik vs Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक पुन्हा भिडणार, परिवहन समिती निवडणुकीत आमने-सामने

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com