मुंबई

मुख्यमंत्री शिंदे अन् राज ठाकरेंमध्ये 'वर्षा'वर खलबत; भाजपचे मंत्रीही उपस्थित

सरकारनाम ब्यूरो

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट झाली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभाच लोढा हे देखील उपस्थित होते. या भेटीचा फोटो समोर आला आहे.

साडेतीनच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले होते. राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचे कारण असले तरी यात राजकीय चर्चाही होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये स्वतंत्र २० मिनिटे चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष लागले आहे. वर्षा बंगल्यावरील या भेटीला शिंदे, राज ठाकरे यांच्यासोबतच मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित आहेत.

शिवसेनेत पडलेली फूट, मुंबई महापालिका निवडणूक आणि अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत चर्चा होईल असा तर्क लावला जात आहे. गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे यांनी तीन वेळा शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे याआधी 'वर्षा' बंगल्यावर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तर त्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतीर्थवर ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

दरम्यान, एकीकडे राज ठाकरे आणि शिंदे यांची भेट होत असतानाच दुसरीकडे मनसेने घाटकोपरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी केलेली आहे. वारसा हा विचाराने चालतो रक्ताने तर वारसदार ठरतो. अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. राज ठाकरे यांनी आतापर्यंत जी आंदोलन केली ती चुकीचे ठरवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपद तसेच सत्ता देखील गमावली, अशी टिका बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचे काम या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

यावेळी शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठींबा देणार का? यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची एखादी सभा व्हावी, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह केल्याचेही समजते. अंधेरी पूर्व भागातील मराठी मतदार बघता आणि उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी राज ठाकरे यांची एखादी सभा व्हावी, अशी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पालिका निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि मनसेने मिळून उद्धव ठाकरेंना कशी टक्कर द्यायची, यावरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT