Eknath Shinde, Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : एकनाथ शिंदेंचा 'वडा' झाला की अजित पवारांचा?; वडापाव महोत्सवात राज यांचा टोला

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाला. यानंतर राज्यातील राजकारणात कधी काय होईल? याचा नेम नाही, असे बोलले जाते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सतत महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत आहेत. आता मनसेच्या वडापाव महोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झणझणीत टोला लगावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीला काही तास उलटत नाही तोच राज ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईतील मनसे आयोजित केलेल्या 'वडापाव महोत्सवा'त राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राच्या सद्याच्या राजकारणावर राज ठाकरेंनी मोठे वक्तव्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्राचा वडापाव कुठे-कुठे पोहोचलाय. ज्या अशोक वैद्य यांनी वडापाव सुरू केला. वडापाव ही संकल्पाना ज्या माणसाने आणली, अशा माणसांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. लंडनमधील नागरिकही वडापाव खातायेत. पण आम्हाला कौतुक मॅक्डोनल्ड अन् डॉमिनोजचे. पण वडापावचे नाही. सातासमुद्रापार गेलेला, मोठमोठ्या क्रिकेटर्सपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांना भुरळ पाडणारा मराठी खाद्यसंस्कृतीतील 'वडापाव'चाही त्याहून जास्त अभिमान वाटायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले. ( Maharashtra Politics Latest News )

राज ठाकरे यांनी यावेळी वडापावचे महत्त्व सांगितले. तसेच इच्छा असूनही खाता येणार नाही, अशी खंतही व्यक्त केली. "गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिल्यावर आताच्या राज्य सरकारची आठवण येते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहेत, की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला वडा एकनाथ शिंदे आहेत?", असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी महायुती सरकारला झणझणीत टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT