NCP News : ''भाजपच्या गाळात 'ते' रुतणार आहेत, त्यांना...'' ; शरद पवारांचं आमदार, खासदारांच्या बैठकीत विधान!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : ...यामुळे आगामी काळात अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील तणाव अधिक वाढणार असल्याचे दिसत आहे.
Ajit pawar, Sharad Pawar
Ajit pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. आपलाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा ते करत असून, खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे, याचा निर्णय निवडणूक आयोग तसेच हाय कोर्टातच होईल, असे दोन्ही गटांच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

अजित पवार पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसह अनेक आमदारांना घेऊन बाहेर पडल्याने राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरूनच आपण भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) सत्तेत सहभागी झाल्याचे सांगत, अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यामुळे पुढील काळात अजित पवार(Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार यांच्यातील वाद अधिक वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit pawar, Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवारांनी अजितदादांचे आरोप चोवीस तासांत खोडले

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने कर्जत येथे मंथन शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले. सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी माझ्यासह पक्षाचे दहा ते बारा वरिष्ठ नेते 'देवगिरी'ला गेलो होतो.

तेथे खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांना बोलावून निर्णय सांगण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांच्या सांगण्यावरूनच सत्तेत सहभागी झालो, असे अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात सांगत. शरद पवारांच्या भूमिकेवर टीका केली होती.

याशिवाय, शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याचा प्रकरणावर अजित पवार यांनी भाष्य करत राजीनामा मागे घ्यायचा होता, तर दिलाच कशाला असा प्रश्नही उपस्थित केला. अजित पवार गटामध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे प्रफुल पटेल हे शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर गेल्या काही दिवसांपासून आक्षेप घेत कडक शब्दांत टीका करत आहेत.

Ajit pawar, Sharad Pawar
Sharad Pawar : "...म्हणून पटेलांच्या पुस्तकांची वाट पाहतोय...!" ; शरद पवारांचा थेट वर्मावरच घाव

या पार्श्वभूमीवर पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांची बैठक बोलाविली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे, अनिल देशमुख, आमदार अशोक पवार यांच्यासह अन्य आमदार या वेळी उपस्थित होते.

या बैठकीत सध्या शरद पवार यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आपणदेखील आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली पाहिजे, अशी मागणी उपस्थितांनी केली. प्रदेश अध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्याकडूनही अजित पवार गटाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

Ajit pawar, Sharad Pawar
Vijay Shivtare : ''संजय राऊत यांनी आपली लायकी ओळखावी आणि...'' ; विजय शिवतारेंचा घणाघात!

शरद पवार अजित पवार गटाबद्दल नेमकं काय म्हणाले? -

या बैठकीत आपली भूमिका मांडताना शरद पवार म्हणाले की, ''जे गेले त्यांना जाऊ द्या, त्यांच्याबद्दल जास्त विचार करू नका. ते भाजपच्या गाळात रुतले जाणार आहेत, त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करू नका. ते ऐकणार नाहीत. उलट यानिमित्ताने नेतृत्वाची एक नवीन फळी तयार होईल, त्यामुळे नवीन दमाने कामाला लागा,'' असा सल्ला पवार यांनी दिल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com