Raj Thackeray, Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना आता मनसेचे चॅलेंज! काय म्हणाले राज ठाकरे?

Shrikant Shinde Kalyan Lok Sabha : बदलापूर येथील विश्व हिंदू परिषदेच्या 50 ते 60 युवकांनी मनेसत प्रवेश केला आहे.

Bhagyashree Pradhan

Kalyan political News : कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीत चढाओढ असतानाच मनसेनेही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. कल्याण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंना आपला बालेकिल्ला राखण्यासाठी मोठी परीक्षा द्यावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Raj Thackeray News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दोन दिवसाचा कल्याण दौरा नियोजित केला आहे. त्यांनी शुक्रवारी येथील स्प्रिंग टाईम या हॉटेलमध्ये कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी निवडणूक लढवण्यास कार्यकर्त्यांनी होकार दिला आहे. यावेळी बदलापूर येथील विश्व हिंदू परिषदेच्या 50 ते 60 युवकांनी पक्षप्रवेश केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसे कल्याण लोकसभेची (Kalyan) निवडणुकीत उतरणार असल्याने येथील लढत चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) निवडणूक लढवणार आहेत. मात्र इतर पक्षही येथून निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांना शह देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आणि मंत्री असलेले कपिल पाटील निवडणूक लढवणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कल्याणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते (MNS) यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी का, असा प्रश्न केला. त्यावर पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्यास होकार दिला. त्यानंतर राज यांनी संघटनात्मक बांधणी करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पुढील आठवड्यापर्यंत निवडणुकीसाठी बांधणी करण्यास सांगितले आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू करा असे आदेशही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत आपापल्या विभागातील पदाधिकाऱ्यांची यादी गोळा करावीत. त्यानंतर लोकसभा निवडणुकीबाबत आपण भूमिका स्पष्ट करू, असेही या बैठकीत राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT