Raj Thackeray 
मुंबई

Raj Thackeray on Meat Ban: मांसबंदी करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला राज ठाकरेंचं थेट आव्हान! कार्यकर्त्यांना दिला 'हा' कार्यक्रम

Raj Thackeray on Meat Ban: स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला राज्यातील अनेक महापालिकांनी कत्तलखाने आणि चिकन-मटणची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

Amit Ujagare

Raj Thackeray on Meat Ban: स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला राज्यातील अनेक महापालिकांनी कत्तलखाने आणि चिकन-मटणची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. यावरुन सध्या राज्यात बराच गदारोळ माजला आहे. सरकारनं जनतेच्या खाण्यापिण्यावर निर्बंध आणत असल्याचा आरोप केला जातो आहे. या वादामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी थेट आपल्या मनसैनिकांना महापालिकेचा हा आदेशच पाळू नका असाच थेट आदेश दिले आहे.

मांसबंदीवर राज ठाकरे बोलले

आज मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महापालिकांनी १५ ऑगस्टला मांसबंदीच्या काढलेल्या आदेशावर भाष्य केलं. "१५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांसविक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे. स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचं स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे?" असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला.

मनसैनिकांना दिला कार्यक्रम

दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांना अर्थात मनसैनिकांनाच यावेळी राज ठाकरेंनी एक कार्यक्रम दिला. त्यांनी म्हटलं की, "मुळात कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे की ही बंदी पाळू नका"

बंदीवर जनतेची प्रचंड नाराजी

मांसबंदीच्या मुद्द्यावरुन विविध राजकीय मंडळी, सामान्य नागरिक आणि चिकन-मटण विक्रेते यांनी महापालिकांच्या या आदेशावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारनं विनाकारण धार्मिक मुद्दे उकरुन काढत आहे. १५ ऑगस्टला मांसबंदी करणं हे अत्यंत चुकीचं आहे, लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही, असं सार्वजनिक मत व्यक्त केलं जात आहे.

मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

यावरुन सरकार टार्गेट होत असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं. या मांसबंदी संदर्भातील शासन आदेश आमच्या सरकारनं काढला नसून तो १९८८ साली काँग्रेसच्या सरकारनंच काढला असल्याचं सांगताना दरवर्षी हे आदेश महापालिकांकडून काढले जातात, असंही सांगितलं. त्याचबरोबर कोणी काय खावं? याच्याशी सरकारला काहीही देणंघेण नाही. आमच्यापुढे अनेक प्रश्न आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी मांसबंदीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT