Raj Thackeray Speech : Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Speech : राज ठाकरेंनी हिरवा झेंडा दाखवून आंदोलनकर्त्यांना केलं चार्ज

Raj Thackeray Politics: आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५ हजार ६६६ कोटी रुपये आहे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: मी इथे मोठं भाषण करायला आलो नाही, फक्त हिरवा झेंडा दाखवायला आलो आहे. अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आंदोनल कर्त्यांना चार्ज केलं आहे. आज पनवेलमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. याचवेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही चांगलंच धारेवर धरलं आहे.

"आज मी इथं मोठं भाषण करण्यासाठी नाहीतर या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय. चांद्रयान करून काय फायदा? तिथले खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

राज ठाकरे म्हणाले, २००७ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. त्यानंतर इतकी सरकारे आली पण कोणत्याही सरकारने मुंबई- गोवा रस्त्याचं काम केलं नाही. इतक करूनही जनता त्याच लोकांना कशी निवडून देते ? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय मतदारांना काहीच वाटत नाही?

आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५ हजार ६६६ कोटी रुपये आहे. तरीही या रस्त्याची गंभीर अवस्था आहे. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीनजींना विनंती केली होती की, जर राज्य सरकारला जमत नसेल तर तुम्ही घ्या तर, ते म्हणाले की 'अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात.' हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का? अशी शंकाही राज ठाकरेंनी उपस्थित केली.

चांद्रयान होऊ शकतं पण महाराष्ट्रात चांगले रस्ते का होऊ शकत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या रस्त्यांमुळे महाराष्ट्रातल्या लोकांचे शब्दशः हाल केलेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं? मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोन केला होता. समृद्धी महामार्ग करून इतके दिवस झाले पण अजून तुम्ही फेन्सिंग का नाही केलं? रस्त्यावर अनेक प्राणी येत आहेत, त्यांचे अपघात होत आहेत, गाड्यांचे अपघात होत आहेत. इतकी साधी गोष्ट पण सरकारच्या लक्षात येऊ नये ? असही त्यांनी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT