Eknath Shinde News : मला 'चेकमेट' करण्याचा काहींचा प्रयत्न; मुख्यमंत्रीपद चर्चा सुरू असताना शिंदेंचे सूचक वक्तव्य..

Eknath Shinde On CM Post : मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाही. काही विरोधक तिरकी चाल चालतात, काही अडीच घरे चालणारे घोडे राजकारणात आहेत. मात्र जनता आपल्यासोबत असल्याने विरोधक नेहमी चितपट होतात. राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्या सारख्या नेत्यांना बुद्धीबळ खेळणे फार गरजेचे आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर आरोप करीत असलेल्या विरोधकांना त्यांनी शेलक्या शब्दात टोला लगावला आहे.

Eknath Shinde
Praniti Shinde On Loksabha Candidature: सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या...

ठाण्यात बुद्धिबळ स्पर्धा होती, यासाठी पद्मविभूषण बुद्धिबळपट्टू विश्वनाथ आनंद आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले. राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-पवार सत्तेत आहेत. मात्र या तीन पक्षात समन्वय नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde News : आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात ; एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसले..

गेल्या काही दिवसापासून अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी देखील चर्चा देखील रंगली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला होता. दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर बोललात. ठाण्यात समाजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे आहेत, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.