Eknath Shinde and Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On CM Shinde: 'एकनाथ शिंदे मोठे नेते, अमेरिकेतही त्यांच्या सभा होतील'; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Rajsathan Vidhnsabha Election: राजस्थानमधील जयपूरमध्ये भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले आहेत.

Ganesh Thombare

Mumbai News: पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे भाजपने अनेक नेते या निवडणुकीच्या प्रचारात उतरवले आहेत.

यामध्ये महाराष्ट्रातून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भाजपच्या प्रचारासाठी राजस्थानमधील जयपूर येथे गेले आहेत. यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे. "एकनाथ शिंदे मोठे नेते आहेत, त्यांच्या अमेरिकेत देखील सभा लावल्या पाहिजेत", असं राऊतांनी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मुख्यमंत्री शिंदेंना प्रचार करू द्या, पुढच्या वर्षी अमेरिकेची निवडणूक आहे, त्यानंतर युरोपमधील सात राष्ट्रांमध्येही निवडणुका होणार आहेत. ते एवढे मजबूत नेते आहेत, त्यांना अमेरिकेत शिकागोमध्येही त्यांच्या सभा लावल्या जाणार आहेत. फ्रान्सची निवडणूक आहे, तिकडे देखील त्यांना बोलवलं जाईल", असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

पुढे बोलताना त्यांनी भाजपसह मुख्यमंत्री शिंदेंनाही आव्हान देत "महाराष्ट्रात आधी महापालिकेच्या निवडणुका घ्या, येथे प्रचार करून दाखवा. पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक घ्यायला तयार नाहीत अन् चालले जयपूरला", असा चिमटाही संजय राऊतांनी काढला. दरम्यान, आता संजय राऊतांच्या टीकेनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरु होण्याची शक्यता आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT