Dr Amol Kolhe: खासदार कोल्हेंचं चाललंय तरी काय ? अपात्रतेच्या पत्रातून सकाळी वगळलं नाव, दुपारी अजितदादांच्या भेटीला

Amol Kolhe meet Ajit Pawar : या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Amol Kolhe and Ajit Pawar
Amol Kolhe and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात राजकीय संघर्ष सुरु आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत खासदार प्रफुल्ल पटेलांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली, तर दुसरीकडे अजित पवार गटानेही लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापतींकडे याचिका दाखल करत शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्याची मागणी केली, असे असतानाच गुरुवारी अचानक खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ज्यावेळी अजित पवारांनी पक्षात बंड करत युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांच्याबरोबर खासदार अमोल कोल्हे देखील होते. मात्र, नंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आज अचानक कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या मनात नेमकं चाललंय काय ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Kolhe and Ajit Pawar
NCP Crisis: प्रफुल्ल पटेलांचं टेन्शन वाढलं; राज्यसभेच्या सभापतींकडे राष्ट्रवादीची मोठी मागणी

यातच अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या विरोधात लोकसभा अध्यक्षांकडे आणि राज्यसभेच्या सभापतींकडे शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्याच्या याचिकेतून खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचे नावं वगळण्यात आल्याची चर्चा आहे. पण यानंतर अमोल कोल्हेंनी अचानक अजितदादांची भेट घेतल्यामुळे आता उलट सुलट चर्चा सुरु रंगल्या आहेत.

अजितदादांच्या भेटीवर कोल्हे काय म्हणाले ?

"अजितदादा हे नियोजन मंत्री आहेत, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली अनेक वर्ष पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडीसीटी असेल, या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अजितदादांनी महत्त्वाची भूमिका आहे. या प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेतली", असे कोल्हेंनी भेटीनंतर माध्यामांशी बोलताना सांगितले.

"मी विकासकामांबाबत भेटीसाठी आलो होतो, कोणत्याही राजकीय विषयावर बोलणं उचित नाही. मतमतांतर चर्चेत नव्हते, विकास कामाच्यावेळी अजित पवार मतमतांतर आणत नाहीत", असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्याच्या याचिकेत तुमचे (अमोल कोल्हे यांचे) नाव वगळले, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "मला याबाबत भाष्य करता येणार नाही, माझे नाव अपात्रतेच्या यादीत नाही", असे मला आताच कळत आहे, मला वाटते उद्याच्या सुनावणीत तुम्हाला याबाबत कळेलच, असे ते म्हणाले.

(Edited By - Ganesh Thombare)

Amol Kolhe and Ajit Pawar
MP Amol Kolhe News : फुटीनंतर राष्ट्रवादी अॅक्टिव्ह मोडवर; खासदार अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com