Raju Patil latest statement on Maharashtra issues Sarkarnama
मुंबई

Raju Patil News : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय, माजी आमदाराने सगळं गणित समजवून सांगितलं

Raju Patil alleges injustice to Maharashtra: केंद्राकडून महाराष्ट्राला केवळ ९.४९ लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा राजू पाटील यांनी केला आहे.

शर्मिला वाळुंज

Maharashtra development funds debate: महाराष्ट्रातून केंद्र सरकारकडे जमा होणाऱ्या कर महसुलाच्या तुलनेत राज्याला मिळणारा निधी अपुरा असल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सामाजिक माध्यम 'एक्स'वरील पोस्टद्वारे त्यांनी ही भूमिका मांडली.

राजू पाटील यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २०१४ ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातून आयकर, कॉर्पोरेट कर आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून केंद्राच्या तिजोरीत सुमारे ३३ ते ३५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच्या बदल्यात केंद्राकडून महाराष्ट्राला केवळ ९.४९ लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

"महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान देणारा राज्य आहे. कर संकलनातून मोठ्या प्रमाणावर निधी केंद्राकडे जात असताना राज्याला त्याच्या तुलनेत कमी निधी मिळत आहे. तरीही केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर मोठे उपकार केल्याप्रमाणे चित्र उभे केले जात आहे," अशी टीका त्यांनी केली.

तसेच आर्थिकदृष्ट्या मागास राज्यांना निधी देण्यास महाराष्ट्राचा विरोध नसला, तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक निधी आणि प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. "महाराष्ट्र हा देणारा आहे, मागणारा नाही. राज्याच्या आर्थिक योगदानाचे भान केंद्र सरकारने ठेवावे," असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT