Dombivli political controversy : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये गेला. तर, भाजपमधील तीन नगरसेवकांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने फोडले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेता देखील भाजपमध्ये गेला.
अजून काही पक्षांतर होणार असल्याची चर्चा कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात आहेत. या पक्षांतरावरून मनचे माजी आमदार राजू पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.
ते म्हणाले, “हे एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत. भांडतोय असं दाखवतात, पण एकाच थाळीतून खातात, हा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेला नाही तर शिंदे गटाला बसला आहे. मी हे सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. राजकारणाची जमीन ओळखतो. आज जो बदलला तो आधीपासूनच तयारीत होता.
पाटील म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत हेच नाटक सुरू असतं. लोकसभा आणि विधानसभेला तिकीट मागत भांडणं, आरोप–प्रत्यारोप आणि नंतर पुन्हा एकत्र येणं — हा ठरलेला कार्यक्रम आहे. “भांडण हे सगळं लोकांच्या नजरा फिरवण्यासाठी. भ्रष्टाचार झाकण्यासाठी हे नाटक होतं आणि पुन्हा होत राहील,” असे देखील त्यांनी म्हटले.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवाकर (दी. बा.) पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. “यादीत नाव घुसवायची वेळ आली की आगरी समाज आठवतो. 27 गाव बाहेर काढणार म्हणालात, आम्ही पाठीशी उभे राहिलो, भाजपचे उमेदवार निवडून दिले. पण त्यानंतर काय केलं?” असा थेट सवाल पाटील यांनी विचारला.
“एक गोष्ट खरी आहे. विरोधक राहिलेच नाहीत. सर्व मिंदे झाले आहेत. सर्वांना आमिष दाखवलं गेलं आहे. कोणाचाही पाठीचा कणा उरला नाही. आरएसएसलाही हे चालत नसेल. यादीत नाव काढून बघा… कोणकोण येतंय ते दिसेल,” असा टोमणा पाटील यांनी मारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.