Ram Kadam News :  Sarkarnama
मुंबई

Ram Kadam News : 'आयुष्यभर ज्यांनी ढोंगच केले...' ; राम कदमांकडून शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाची खिल्ली!

Ram Kadam News : ...त्यांनी असे आंदोलन करणे ही मोठी हास्यास्पद गोष्ट

Chetan Zadpe

Mumbai News : आयुष्यभर ज्यांनी ढोंग आणि सोंग केले ते आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी विरोधकांनी विधिमंडळाच्या आवारात सरकारविरोधात केलेल्या आंदोलनाची खिल्ली उडविली. आज आंदोलन करतात, पण सत्ता होती तेव्हा वसुली करत होते, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या सभासदांनी आंदोलन केले. कापसाच्या बोंडाची माळ गळ्यात घालून शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्यकर्ते मात्र आपल्या धुंदीत असल्याची टीका करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील कडक शब्दांत विरोधकांनी टीका केली होती.

या सर्व आंदोलनाचा आपल्या खास शैलीत समाचार घेत भाजप आमदार राम कदम यांनी खिल्ली उडविली. कदम म्हणाले, "जे आज आंदोलन करत आहेत, त्यांची सत्ता असताना ते वसुलीमध्ये अडकले होते. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नव्हते. वाझे मार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यामध्ये कोणाला आनंद होता, हे यापूर्वीच समोर आलेले आहे."

विरोधकांनी केलेले हे आंदोलन म्हणजे सोंग आहे. आयुष्यभर ज्यांनी केवळ मदत देण्याचे ढोंग आणि ढोंगच केले, त्यांनी असे आंदोलन करणे ही मोठी हास्यास्पद गोष्ट असल्याची टिप्पणी कदम यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी आमची भूमिका असून, त्याबाबतच्या स्पष्ट सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याच्या आमदार राम कदम यांनी सांगितले.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT