Shivsena Politics : उत्साह वाढलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मतदारसंघातही निरीक्षक नेमले!

Shivsena (Eknath Shinde Group) declaires loksabha election leaders-चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही उत्साह वाढला आहे.
CM Eknath Shinde & Bhausaheb Choudhary
CM Eknath Shinde & Bhausaheb ChoudharySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politcs : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालांनी भाजपचा उत्साह वाढला आहे. मात्र त्याचा लाभ घेत शिवसेना शिंदे गट देखील तयारीला लागला आहे. आज त्यांनी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी दहा निरीक्षक जाहीर केले आहे. या निरीक्षकांना तातडीने निवडणुकीच्या तयारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. (CM Eknath Shinde`s Shivsena also starts prepration after Four States Assembly Results)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) विविध लोकसभा मतदारसंघांवर दावा सांगण्यात आला आहे. भाजपने (BJP) देखील सर्व मतदारसंघात तयारी केली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचा वाढलेला उत्साह आगामी राजकारणाचे नवे संकेत देत आहे.

CM Eknath Shinde & Bhausaheb Choudhary
Maharashtra Politics : बारामतीचा प्रश्न विचारताच छगन भुजबळांनी गप्प राहणेच पसंत केले!

जाहीर केलेले विभागीय संपर्क नेते असे, कोकण विभागाच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत, ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, मुंबई शहर व उपनगरसाठी सिद्धेश कदम आणि किरण पावसकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, हिंगोली व धाराशिव जिल्ह्यांसाठी आनंदराव जाधव, जालना, संभाजीनगर, परभणी व बीड जिल्ह्यांसाठी अर्जुन खोतकर, उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांसाठी भाऊसाहेब चौधरी, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूरसाठी विजय शिवतारे, पुणे, सोलापूरसाठी संजय मशीलकर, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीसाठी दीपक सावंत, पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांसाठी विलास पारकर आणि वाशीम, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांसाठी विलास चावरी यांची नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर पक्षाने देखील "मिशन २०२४" ची घोषणा करीत महायुतीची आक्रमक रणनिती असल्याचा संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये विद्यमान खासदारांचे किती मतदारसंघ शिंदे सेनेला सुटणार यावरून नवा वाद निर्माण होतो, की महायुतीतील तिन्ही पक्ष समन्वयाने तयारी करतात, याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वांच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी निर्णायक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या नेमणुकांमध्ये विद्यमान मंत्र्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत विभागीय संपर्क नेते आणि जिल्हानिहाय लोकसभा निरीक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्षांमध्ये समन्वय राखून महायुतीचा उमेदवार निवडुन आणण्याची रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

CM Eknath Shinde & Bhausaheb Choudhary
Dhananjay Munde News : परळीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आकर्षण काय? पंकजाताईचे नाव घेत मंत्री मुंडेंचे मोठे विधान

मतदारसंघनिहाय निरीक्षक

राजेश पाटील (नंदुरबार), प्रसाद ढोमसे (धुळे), सुनील चौधरी (जळगाव), विजय देशमुख (रावेर), अशोक शिंदे (बुलढाणा), भूपेंद्र कवळी (अकोला), मनोज हिरवे (अमरावती), परमेश्वर कदम वर्धा), अरुण जगताप (रामटेक), अनिल पडवळ (नागपूर), आशिष देसाई (भंडारा-गोंदिया), मंगेश काशीकर (गडचिरोली-चिमूर), किरण लांडगे (चंद्रपूर), गोपीकिशन बजौरीया (यवतमाळ-वाशिम), सुभाष सावंत (हिंगोली), दिलीप शिंदे (नांदेड), सुभाष साळुंखे (परभणी), विष्णू सावंत (जालना), अमित गिते (छत्रपती संभाजीनगर), सुनील पाटील (दिंडोरी ), जयंत साठे (नाशिक), रवींद्र फाटक (पालघर), प्रकाश पाटील (भिवंडी), मंगेश सातमकर (रायगड), विश्वनाथ राणे (मावळ), किशोर भोसले (पुणे), अशोक पाटील (शिरूर ), अभिजित कदम (नगर), राजेंद्र चौधरी (शिर्डी), डॉ. विजय पाटील (बीड), रवींद्र गायकवाड (धाराशिव), बालाजी काकडे (लातूर), इरफान सय्यद (सोलापूर), कृष्णा हेगडे (माढा), राजेश क्षीरसागर (सांगली ), शरद कणसे (सातारा), राजेंद्र फाटक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), उदय सामंत ( कोल्हापूर), योगेश जानकर ( हातकणंगले).

CM Eknath Shinde & Bhausaheb Choudhary
Maharashtra Politics : केळी उत्पादकांसाठी रक्षा खडसेंचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com