Sanjay Raut: Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: 'बाबरीचे घुमट कोसळल्यावर पळून जाणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये'; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Ganesh Thombare

Mumbai News: श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपाने जाहीर केले आहेत, जे प्रभू श्री रामाला हात धरुन मंदिरात नेत आहेत, हे भाजपचं हिंदुत्व आहे का ? असा सवाल करत भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात राऊतांनी केला.

तसेच 2024 नंतर कुणाचं हिंदुत्व आहे, हे सर्वांना समजेल. हे सर्व डरपोक आहेत, बाबरीचे घुमट ज्यावेळी कोसळलं त्यावेळी जे पळून गेले होते, त्यांनी आता आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा कडक शब्दात खासदार राऊत यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने घाबरुन बाबरी पाडल्याचं खापर शिवसेनेवर फोडलं. बाबरी आम्ही पाडली नाही, असं भाजपने काखा वर करून सांगितलं होतं. मात्र, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सांगितलं होतं की, बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा अभिमान आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या बाबतीत व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण, हे समजलं असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कुणी निमंत्रण देण्याची गरज नाही, अशी खोचक टीका राऊतांनी भाजपवर केली.

याचवेळी खासदार राऊतांनी भाजपने छापलेल्या एका पोस्टरवर आक्षेप घेत टीका केली. प्रभू श्री रामाचे बोट धरुन ते राम मंदिरामध्ये नेत आहेत, असे एक पोस्टर भाजपने छापले आहे. जसं नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे विष्णूचा अवतार आहेत. राम भक्तांच्या भावना दुखावणारे हे पोस्टर आहे. मग भाजपचं हेच हिंदुत्व आहे का ? 2024 नंतर हिंदुत्व कुणाचं आहे, हे सर्वांना समजेलच, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला.

राम मंदिराच्या लढ्यात आम्ही सामान्य नागरिक म्हणून उतरलो होतो. मग त्यावेळी हे व्हीआयपी कुठे गेले होते, असं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर हल्लाबोल केला.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT