Shambhuraj Vs Raut : आता कुठं नको ते नाव काढताय? राऊतांबाबत विचारताच देसाई चिडले

Shivsena News : कुठलेतरी फोटो दाखवून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडून सुरू आहे.
Shambhuraj Desai - Sanjay Raut
Shambhuraj Desai - Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Satara News : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचे नाव काढताच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी शेलक्या शब्दांत टोला लगावला. ‘सगळं चांगलं चाललेलं असताना कुठं नको ते नाव काढताय. काल-आजपासून संजय राऊतांनी आता भाजप पदाधिकाऱ्याने पार्टी आयोजित केल्याचं म्हणू लागले आहेत. त्यावर भाजपनेही स्पष्ट भूमिका घेतली असून असा कुठलाही आमचा पदाधिकारी नसल्याचे म्हटले आहे. तेव्हा आता राऊतांनी थोडं थांबावं, लवकरच कळेल,’ असे देसाई यांनी म्हटले आहे.  (Shambhuraj Desai got angry when asked about Sanjay Raut)

सलीम कुत्ता याच्या पार्टीविषयी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पोलिस योग्य तो तपास करत आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी आता थोडं थांबावं. कारण, त्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांबाबत भाजपने आता मत व्यक्त केले आहे. कुठलेतरी फोटो दाखवून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडून सुरू आहे. सुरुवातीपासून काय चालू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shambhuraj Desai - Sanjay Raut
Madha Loksabha : मोहिते पाटील-निंबाळकर वादावर बावनकुळे अकलूजमध्ये तोडगा काढणार?

बडगुजरने पार्टी दिली. सलीम कुत्ता हा दाऊदचा हस्तक त्या पार्टीत होता. ते फार्महाऊस बडगुजरच्या नातेवाईकांचे आहे. आता तपास चालू आहे, चाैकशी चालू आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी कुठलातरी फोटो दाखवायचा म्हणजे विषयांतर करण्यासाठी कुणाचं तरी ते नाव घेत आहेत, असा टोला देसाई यांनी राऊतांना लगावला.

संजय राऊतांचे भाजपवर आरोप

सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. भाजप पदाधिकारी व्यकंटेश मोरे याचा फोटो दाखवत संजय राऊतांनी चाैकशीची मागणी केली आहे. सलीम कुत्ता हा मुंबई बाॅम्बस्फोटातील गुन्हेगार आहे, तर तो कुणाच्या सहीवरून जेलबाहेर आला, 2016 मध्ये कोण गृहमंत्री होते, याची चाैकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

Shambhuraj Desai - Sanjay Raut
Maval Loksabha : मावळात शिवसेना VS शिवसेना; बारणेंची हॅटट्रिक होणार की स्वप्न भंगणार?

लिहून ठेवा महायुतीचे 45 खासदार निवडून येणार

'इंडिया' आघाडीच्या बैठकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे, तो त्यांचा त्यांना लखलाभ असो. महाविकास आघाडीमध्ये फॉर्म्युला जरी ठरवला, तरी किती जागा निवडून येणार आहेत याचा विचार त्यांनी करण्याची गरज आहे. पण, आज मी सांगतो आजची तारीख, आजची वेळ, आजचे ठिकाण तुम्ही नोंद करून घ्या. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 45 पेक्षा अधिक खासदार निवडून येतील, एवढेच मी सांगतो, असा दावाही देसाई यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

Shambhuraj Desai - Sanjay Raut
Dr Amol Kolhe : अजितदादांनी चॅलेंज दिलेले डॉक्टर, अभिनेते ते यशस्वी खासदार डॉ अमोल कोल्हे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com