Raj Thackeray News Sarkarnama
मुंबई

Ram Mandir Inauguration : अयोध्येचा राजा स्थानापन्न अन् 32 वर्षांनी शरयू नदी हसली !

Ayodhya Ram Mandir Inauguration Raj Thackeray Reaction : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहून राज ठाकरे भारावले...

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray Reaction On Ram Mandir Inauguration :

अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक मान्यवर, कलाकार उपस्थित होते. मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनाही राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, सोहळ्याला ते उपस्थित राहिले नाहीत.

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर देशभरात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण आहे. अयोध्येतील आजच्या सोहळ्यानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी एक पोस्ट केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी ट्विटरवरून केलेल्या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह राज ठाकरे यांनी राम मंदिरासाठी संघर्ष केलेल्या कारसेवकांची आठवण केली आहे. 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !' असे राज ठाकरे म्हणाले. याच ओळी राज ठाकरे यांनी हिंदी आणि इंग्रजीत पोस्ट केल्या आहेत.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT