Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay Munde Sarkarnama
मुंबई

Dhananjay Munde News : केंद्रीय मंत्र्यांचं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सूचक विधान; म्हणाले,'कराडशी त्यांचा चांगला संबंध...'

Santosh Deshmukh Murder Case : आता या प्रकरणात कोणताही आरोपी सुटणार नाही. याच दृष्टिकोनातून पोलिसांनी ही केस बनवली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,अशा प्रकारची भूमिका माझी असून देशमुख कुटुंबियांसमोरही हीच भूमिका मांडली आपण हीच भूमिका मांडली आहे, असंही आठवलेंनी यावेळी सांगितलं.

Deepak Kulkarni

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे बीडसह संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं होतं. राज्यभरात अनेक ठिकाणी काढलेल्या जनआक्रोश मोर्चांनी तपासयंत्रणांसह सरकारवही तपासासाठी दबावही आणला.

वाल्मिक कराडसोबत या घटनेत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप केले जात आहे. याचदरम्यान,आता केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे.अशातच आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सूचक विधान केलं आहे.

मुंबईत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेत त्यांच्यासोबत संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यानंतर आठवलेंनी मीडियाशी बोलत होते.

आठवले म्हणाले,धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही पॉलिटिकल आहे. वाल्मिक कराड याच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते,ही गोष्ट खरी आहे. पण खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात त्यांचा संबंध दिसून येत नाही. नैतिकतेच्या आधारे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर ठीक आहे. मात्र,त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही पॉलिटिकल आहे. त्याबाबत आता अजित पवार आणि ते स्वत:च जो काय आहे तो निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षेवरहूी त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मुंबईतील आझाद मैदान येथे संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुखांचं कुटुंब मुंबईत आलं होतं. त्यांनाही भेटलो,त्यांच्याशी चर्चा केल्याचंही त्यांनी म्हटलं.

संतोष देशमुख केसमधील जवळजवळ सगळे आरोपी पकडण्यात आले आहेत. एक कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही फरार आहे. कराडवर मकोका लावण्यात यावा अशी मागणी होती, ती ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर 302 लावण्यात यावं,ही मागणीही होत आहे. कराडविरोधात पोलिसांना सगळे पुरावे मिळाल्यामुळे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आता या प्रकरणात कोणताही आरोपी सुटणार नाही. याच दृष्टिकोनातून पोलिसांनी ही केस बनवली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,अशा प्रकारची भूमिका माझी असून देशमुख कुटुंबियांसमोरही हीच भूमिका मांडली आपण हीच भूमिका मांडली आहे,असंही आठवलेंनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT