Congress News : आघाडीच्या चर्चा सोडा; निवडणुका होण्याची गॅरंटी नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

Congress leader doubts elections : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, असे दिसत नाही. त्यामुळे आमच्यासमोर सध्या आघाडीचा प्रश्न नाही. आधी महापालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ द्या.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थ्या निवडणुकीस स्वबळावर लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सेनेने घेतला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या भूमिकेचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत करताना महापालिकेच्या निवडणूक होईलच याची खात्री देता येत नसल्याचे सांगितले. त्या जेव्हा होतील तेव्हा आमची भूमिका ठरवू असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचे सरकार असताना ओबीसी आरक्षणाचा उपस्थित झाला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्हाला सत्ता द्या 24 तासात ओबीसी आरक्षण देऊ असे जाहीरपणे सांगितले होते. अडीच वर्षे महायुतीत सत्तेत होती. आत फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र त्यांचे 24 तास अद्याप संपलेले नाही, असेही पटोले म्हणाले.

Congress
Devendra Fadnavis : 'सीएम' फडणवीसांसमोर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील मित्रपक्षांचंच मोठं आव्हान असणार

ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. 22 जानेवारीला यावर सुनावणी होती. ती आता 28 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अशीच चालढकल सुरू राहील असे दिसते. यावरून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, असे दिसत नाही. त्यामुळे आमच्यासमोर सध्या आघाडीचा प्रश्न नाही. आधी महापालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ द्या. त्यावेळी आघाडीने लढायचे की स्वबळावर हे आम्ही ठरवू, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Congress
Mahayuti Government : सत्तेत येऊन सरकारला महिना उलटला; सत्ताधारी कामाला लागेनात तर विरोधकांना सूर सापडेना ?

काँग्रेसच्या आंदोलनात सातत्य नाही, एकवाक्यता नाही यावरही नाना पटोले यांनी परखड मत व्यक्त केले. मोदी सरकार रोज नवे पाप करीत आहे. त्यामुळे आम्हाला वेगवेगळे विषय घेऊन यावे लागतात. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातही यांना बांगला देशी दिसतात. विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी त्यांना बांगलादेशी घुसखोर दिसले नाही. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. बांगलादेशी घुसखोर भारतात येत असतील, त्यांना आधारकार्ड दिले जात असतील तर हे अपयश मोदी सरकारचे आहे, असेही पटोले म्हणाले.

Congress
Mahayuti News : महायुतीमधील इनकमिंगला नेत्यांनी लावला ब्रेक; भाजपच्या बड्या नेत्याने सांगितले धोरण...

अकरा वर्षांपासून मोदी पंतप्रधान आहेत. तीन वर्षांपासून राज्यात भाजप महायुतीची सत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या संघटनेवर बोलण्याचा भाजप नेत्यांना अधिकार नाही. त्यांचे सदस्य नोंदणी मोहीम मिसकॉल देऊन केली जात आहे. काँग्रेस हा पक्ष तळागाळापर्यंत गेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक काँग्रेसकडे होती. यात भाजपचेही अनेक लोक होते. आयोगाच्या आशीर्वादाने भाजपला सत्ता मिळाली असल्याचा आरोपही यावेळी नाना पटोले यांनी केला.

Congress
Sharad Pawar : शरद पवारांचे पुढील चार दिवसांतील दौरे 'या' कारणामुळे रद्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com