Maharashtra Political News : ठाकरे बंधू यांची युती जवळपास निश्चित झाली आहे. पाच जुलैच्या मुंबईतील विजय मेळाव्यावर यात शिक्कामोर्तब होईल. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. ठाकरेंपाठोपाठ दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा आहेत.
आता पुन्हा महायुतीमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना महायुतीत येण्यासाठी, टाळीसाठी हात पुढं केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या टाळीला कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे.
भाजप महायुतीमधील (Mahayuti) राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केंद्रीय पातळीवर पवार एकत्र आल्याचा बाॅम्ब मध्यंतरी फोडला होता. महाराष्ट्रातील राजकारणात आगामी काळात अनेक बदल दिसणार आहेत. महायुती केंद्रस्थानी राहून, राज्यात दोन्ही पवार एकत्र येतील. केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री होतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.
रवी राणा यांच्या पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादीमध्य 'आय लव यू आहे', असे म्हटले होते. या दोन नेत्यांपाठोपाठ आरपीआय नेते तथा केंद्रातील मंत्री रामदास आठवले यांनी खासदार सुप्रिया सुळे हुशार असल्याचे सांगून, त्यांनी भविष्यात महायुतीत येण्याचा विचार करावा, अशी साद घातली आहे.
रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या हरहुन्नरी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे या हुशार असून, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भविष्यात त्यांनी महायुतीत येण्याचा विचार करावा. आपल्या चांगल्या स्वभावामुळे त्यांनी विरोधकांची मने देखील जिंकली आहेत. भविष्यात सुप्रिया सुळे आमच्यासोबत दिसतील, अशी अपेक्षा करतो, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत्युमुखी पावलेल्या दीपक पाठक यांच्या बदलापुरातील घरी मंत्री आठवले यांनी परत भेट दिली. मंत्री आठवले यांनी त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळेंना महायुतीत येण्याची मुंबईतून मंत्री आठवलेंनी साद घातल्याने त्याचे काय पडसाद उमटतात, आता याकडे लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.