Mumbai News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दोर्यावर असताना आरक्षणाविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनीदेखील मोठं विधान केलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पालघर येथे मंगळवारी (ता.17) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पासपोर्ट रद्द करावा अशी मागणीही केली. आठवले म्हणाले,राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल. मात्र, देशातील आरक्षण कधीही संपणार नाही.बाहेरच्या देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नसल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.
रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या महायुतीतील एन्ट्रीवर फुली मारली.ते म्हणाले, राज ठाकरेंचा महायुतीला काहीच फायदा नाही.मी महायुतीत असल्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेऊ नये. महायुतीत अजित पवार आल्यामुळे महायुतीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा असल्याचंही आठवले यांनी म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींविषयी वादग्रस्त विधान केलं आहे.ते म्हणाले, 'आरक्षण रद्द करण्याबाबतचे विधान करणाऱ्या राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रूपयांचे बक्षीस देऊ,' असं आक्षेपार्ह विधान केलं आहे.गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे
आमदार संजय गायकवाड म्हणाले,महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय,आदिवासी आणि अन्य प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिलं. मात्र, राहुल गांधींनी विदेशात जाऊन,'माझ्या देशातील आरक्षण संपवायचं आहे,' असं विधान केलं. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून राहुल गांधींनी त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर ओकली असल्याची खोचरी टीका त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे,असा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसनं मते घेतली. आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करू लागले आहेत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय,ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना देशातील 200 जणांमध्ये एखादा ओबीसी असेल आणि ते देशात 50 टक्के आहेत.पण,आम्ही आजारपणावर इलाज करत नाही.आरक्षण एकमात्र साधन नाही.इतर पण साधन आहेत,असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.
राज्या-राज्यातील आरक्षणापासून दूर असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करु लागल्या आहेत. आंदोलन करत आहेत. त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरु झाला आहे. त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे.मात्र,सध्या आरक्षण संपवण्याची वेळ नाही. ज्यावेळी योग्य वेळ येईल.त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्या योग्य वेळ नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.