Bharat Gogawale : गोगावलेंना एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची ऑफर; मंत्रिपदाची तहान महामंडळावर भागवणार..

State Transport Corporation Chairman : एसटी महामंडळाबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतोय. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आम्ही महामंडळाचे अध्यक्षपद घेऊ, असेही भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 17 September : मंत्रिपदापासून वंचित राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार भरत गोगावले यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे, अशी माहिती खुद्द गोगावले यांनीच दिली. मात्र, महामंडळ स्वीकारायचे की नाही, याबाबत माझी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्हणजे गोगावलेंची मंत्रिपदाची तहान दुधाऐवजी ताकावर भागवली जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेतील आमदार सदा सरवणकर यांच्याकडे सिद्धिविनायक ट्रस्ट, आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी, माजी खासदार हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राचे प्रमुख, तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना अनुसूचित जाती जमाती आयोगाचं राज्य अध्यक्षपद देण्यात आले आहे.

शिंदे गटातील इतर नेत्यांना महामंडळाचे प्रमुखपद मिळाले असताना तुम्हाला का डावलेले जात आहे, असा प्रश्न आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना विचारण्यात आला, त्या वेळी त्यांनी तसं नाही. आपल्याला एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आलेली आहे. मात्र, ते पद घ्यायचं की नाही घ्यायचं, याबाबत मी अजून ठरवलेलं नाही, असं सांगितलं.

Bharat Gogawale
Assembly Election 2024 : विधानसभेसाठी ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला आचारसंहिता लागणार; शिंदे गटाच्या नेत्याने उघड केली रणनीती

एसटी महामंडळाबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतोय. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आम्ही महामंडळाचे अध्यक्षपद घेऊ, असेही भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. मात्र, अध्यक्षपदाबाबत गोगावले यांची भूमिका काय असणार की पुढील मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा आताच मुख्यमंत्र्यांकडून भरत गोगावले हे शब्द घेत आहेत का?, याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही भाष्य केले आहे. येत्या पाच ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल, असे विधान केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरच विधानसभा प्रचाराचा धुरळा उडणार असल्याचे दिसून येत आहे.

Bharat Gogawale
Bharat Gogawale : भरत गोगावले मंत्रिपदाबाबत प्रचंड आशावादी...आता म्हणतात पुढच्या मंत्रिमंडळात 100 टक्के असेन!

दुसरीकडे मंत्रिपदाची या टर्ममधील आशा आपण आता सोडली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या पाच तारखेला आचारसंहिता लागणार असेल तर वीसेक दिवसांसाठी कुणीही मंत्रिपद घेणार नाही आणि कोणी देणारही नाही, असे सांगून त्यांनी मंत्रिपदाबाबत आपली भावना व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com