Anil Parab's Resort Sarkarnama
मुंबई

ED News : मोठी बातमी : साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम ED च्या ताब्यात, परबांच्या अडचणी वाढणार..

Sadanand Kadam News Update : सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत.

सरकारनामा ब्युरो

Sadanand Kadam News Update : साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते, रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी ईडीने (ED)ने ताब्यात घेतले आहे.

ईडीची टीम त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असं अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे याप्रकरणात आता सदानंद कदम यांची चौकशी सुरू झाल्याने अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे.

आज सकाळी साडेसात वाजता कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊस या सदानंद कदम यांच्या निवासस्थानी ईडीचं पथक आलं होतं. सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन हे पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

उद्धव ठाकरे यांची खेडमधील सभा यशस्वी करण्याकरता सदानंद कदम यांचा पुढाकार होता, म्हणूनच सुडबुद्धीने ही कारवाई झाली असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT