Maharashtra Session 2023 live : भोपळा हातात घेऊन विरोधकांचे आंदोलन सुरु

Maharashtra Session 2023 : आज अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.
Maharashtra Session 2023
Maharashtra Session 2023Sarkarnama

Maharashtra Session 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (शुक्रवारी) अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.

विरोधकांनी आज (शुक्रवारी) अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यावर भोपळा हातात घेऊन आंदोलन केले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधकांच्या घोषणाबाजी केली. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरले आहे.

पंचामृत ध्येयावर आधारित असलेल्या या अर्थसंकल्पात शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, बीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास आदी घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.

Maharashtra Session 2023
Shambhuraj Desai : राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प... शंभूराज देसाई

या बजेटवर विरोधकांनी तोंडसुख घेतलं आहे. हे इलेक्शन बजेट असल्याची टीकाही विरोधकांनी केली. अर्थसंकल्पांवर विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले, "फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प म्हणजे 'गाजर हलवा', वास्तवाचा भान नसलेला अर्थसंकल्प असून हा केवळ चुनावी जुमला आहे,"

राज्यातील कांदा प्रश्न आणि अवकाळी पावसावरुन विरोधक आज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण उत्पादक शेतकरी संकटात आहे. 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळं कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

तर दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे हाती आलेली पीक या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे वाया गेली आहेत. त्यांनातत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.

Maharashtra Session 2023
Kerala Gold Smuggling : CPM सचिव गोविंदन माझी हत्या करतील ; सोने तस्करीतील आरोपीचा दावा ; देश सोडण्याची धमकी

राज्यातील कांदा प्रश्न आणि अवकाळी पावसावरुन विरोधक आज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण उत्पादक शेतकरी संकटात आहे. 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळं कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे हाती आलेली पीक या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे वाया गेली आहेत. त्यांनातत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com