Ramdas kadam disha salian aaditya thackeray .jpg Sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam On Thackeray: रामदास कदमांनी दिशा सालियन प्रकरणावरुन ठाकरेंवर हल्ला चढवलाच; म्हणाले,'शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा...'

Ramdas Kadam VS Aaditya Thackeray : दिशा सालियन हिच्या वडिलांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर केली होती. त्यांनी या याचिकेत आपली मुलगी दिशानं आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. यावरुन आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट आदित्य ठाकरेंबाबत खळबळजनक विधान केलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीतील बॉलिवूडची टँलेट मॅनेजर दिशा सालियन हत्या प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या दिशा सालियनच्या संशयास्पद मृ्त्यूनंतर आता तिच्या वडिलांनीच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिशा सालियन प्रकरणावरुन ठाकरे पिता-पुत्रांवर टीकेची तोफ डागली आहे.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर आता माजी मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) कडवट शब्दांत टीका केली आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे,ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे.

रामदास कदम यांनी गुरुवारी (ता.20) मुंबईत मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करतानाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेयांना याबाबत थोडीतरी लाज असती तर ते दोघेही आतापर्यंत देश सोडून गेले असते,असा हल्लाबोल केला.

नारायण राणे हे सुरुवातीपासूनच दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप करत होते.पण ते दुर्दैवाने पुरावे देऊ शकले नव्हते. मुलाला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राणेंना फोन केल्याची चर्चा होती,असंही कदम यांनी सांगितलं

कदम म्हणाले,आता दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला तर याचा खोलवर तपास होईल. पोलिसांना हाताशी धरुन ठाकरे यांनी पुरावे नष्ट केले आहेत का, याची चौकशी करण्यात यायला हवी,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दिशा सालियन हिच्या वडिलांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर केली होती. त्यांनी या याचिकेत आपली मुलगी दिशानं आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. यात महाविकास आघाडीचे तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे,अभिनेता डिनो मारिया,सूरज पांचोली यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी.दिशाच्या हत्येनंतर रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे 44 फोन कॉल झाले होते,असेही दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत नमूद केले होते.या याचिकेनंतर विधानसभेतही सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी उचलून धरली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे म्हणाले, मागील पाच वर्षापासून मला त्रास देण्याचे सतत चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल.पाच वर्षे बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात उत्तर देऊ, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर ठाकरेंची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेऊन आल्यानंतरही प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी

विधानसभेत आज आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला त्यांनी यावेळी दिला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही ही मागणी उचलून धरली. भाजपच्या सदस्यांनी एसआयटी चौकशीचा अहवाल कधी समोर येणार, आरोपींची चौकशी होणार का, असा सवाल केला. त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी लवकरात लवकर एसआयटी चौकशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT