Disha Saliana Case : दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट, 'मुंबई महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घेतले आदित्य ठाकरेंचे नाव', रोहित पवारांच दावा

Rohit Pawar accuses BJP of politicizing Disha Salian case : भाजपच्या नेत्यांकडून टीका होत असतान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
Aditya Thackeray Rohit Pawar
Aditya Thackeray Rohit Pawar sarkarama
Published on
Updated on

Rohit Pawar News : दिशा सालियान प्रकरणात तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत आपल्या मुलीचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरण आज (गुरुवार) विधान परिषदेमध्येसुद्धा गाजले.

आदित्य ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याकडून, भाजपच्या नेत्यांकडून टीका होत असतान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखन केली आहे.

रोहित पवार म्हणाले, 'सुशांत सिंग आणि दिशा सालियानी यांच्या आत्महत्येचे भाजप फक्त राजकारण करत आहे. ते आजपासून दिसून येईल. पाच वर्षांपूर्वी त्यांनी सुशांत सिंगच्या आत्महत्येचे राजकारण बिहाराच्या निवडणुकीत केले होते. दिशा सालियान यांच्या आत्महत्येचे राजकारण देखील ते करतील. बिहार, मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. आत्ता तुम्ही फक्त टायमिंग बघून घ्या. '

'मी आदित्य ठाकरेंना फार जवळून ओळखतो. त्यांचा स्वभाव, त्यांचा संपर्क आणि ज्याप्रमाणे ते त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात असतात, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर किती काही केलं तरी आदित्य ठाकरेंचे नाव यामध्ये (दिशा सालियान प्रकरण) जूळू शकत नाही. आणि आदित्य ठाकरेंचे याच्याशी काही देणंघेणं नाही, असा आत्मविश्वास मला वाटतो.', असे देखील पवार म्हणाले.

'येथून पुढे काही दिवस भाजपकडून याचे वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल. कारण दिशा सालियानच्या वडिलांनी त्यावेळी सांगितलं होतं या बाबतीमधील राजकारण करू नये. पण आत्ता यावर राजकारण आजपासून सुरू झालेले आपल्याला कळेल. भाजप जेव्हा राजकारण करत तेव्हा त्यामागे काय ना काय हेतू असतो. मुंबईच्या इलेक्शनसाठी हा मुद्दा बाहेर काढतात की नाही हे बघा. आत्महत्येचे राजकारण भाजप करेल, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल.', असे देखील रोहित पवार यांनी सांगितले.

विधान परिषदेमध्ये खडाजंगी

विधान परिषदेमध्ये शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी दिशा सालियान आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या खडाजंगी झाली. अनिल परब यांनी एसआयटीचा अहवाल समोर का नाही ठेवला असा प्रश्न उपस्थित करत एसआयटीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मंत्री जयकुमार गोरे, संजय राठोड, किरीट सोमय्या यांच्यावर का बोलत नाही, असा सवाल देखील उपस्थित केला.

Aditya Thackeray Rohit Pawar
Sugar Factory News : अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याचे पंचवीस वर्ष अध्यक्ष राहिलेल्या गणपतराव तिडके यांचा तडकाफडकी राजीनामा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com