140 कोटी भारतीयांच्या मनावर राज्य करणारे उद्योगपती रतन टाटा आपल्यामध्ये राहिले नाहीत. फक्त उद्योगपती म्हणून नाहीतर दानशूर, दर्यादील आणि दयाळू स्वभावामुळे त्यांना जगभर ओळखलं जाते. 1937 मध्ये जन्मलेल्या रतन टाटा यांनी टाटा समुहाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं.
1991 ते 2012 पर्यंत टाटा समुहाची सूत्रे सांभाळणारे रतन टाटा ( Ratan Tata ) हे कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक असूनही सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगत होते. रतन टाटा हे कोट्यावधींची संपत्ती सोडून गेले आहेत. मात्र, रतन टाटा यांच्यानंतर टाटा समुहाची जबाबदारी कोण सांभाळणार? टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असणार? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
3800 कोटींच्या संपत्तीचे मालक...
सुईपासून जहाज बनवण्यापर्यंत कंपनीला उंचीवर नेण्याचं काम रतन टाटा यांनी केलं. प्रत्येक क्षेत्रात टाटानं आपला डंका पिटला. रतन टाटा यांची संपत्ती जवळपास 3800 कोटी रूपयांची आहे. एवढी संपत्ती असूनही रतन टाटा हे सर्वसामान्याप्रमाणे राहत असतं. भारतातील मध्यमवर्गीयांना कार खरेदी करण्याची हिंमत ज्यांनी दिली, ते रतन टाटा स्वत:हा कार चालवत असत.
उत्तराधिकारी कोण?
रतन टाटा यांनी लग्न केलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या 3800 कोटींच्या संपत्तीचा मालक कोण होणार? त्यांचा वारसा कोण चालविणार? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांच्या तीन मुलांची नावे समोर येत आहेत. नोएल टाटा हे रतन टाटा याचे सावत्र बंधू आहेत.
तीन जणांची नावे चर्चेत...
नोएल टाटा यांची तीन मुले माया, नेविल आणि लिया हे रतन टाटा यांचे उत्तराधिकारी बनू शकतात. हे तीघेजण टाटासन्स मध्ये विविध जबाबदारी सांभाळत आहेत. हे तीघेजणच आता रतन टाटा यांचा वारसा चालविणार, असं बोललं जातं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.