BJP Ravindra Chavan  Sarkarnama
मुंबई

BJP Politics: रवींद्र चव्हाण भाजप मंत्र्यांवर नाराज, कडक शब्दांत कान टोचले; म्हणाले, 'पक्षाकडं लक्ष द्या, तुमच्या...'

Ravindra Chavan Angry on BJP Ministers : लोकसभा असो विधानसभा, अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं आणि मायक्रो प्लॅनिंगनं त्या लढवते. यात संघटनात्मक पातळीवर भाजप नेतृ्त्व फार बारकाईनं लक्ष ठेवून असतं.

Deepak Kulkarni

Mumbai News: लोकसभा असो विधानसभा, अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं आणि मायक्रो प्लॅनिंगनं त्या लढवते. यात संघटनात्मक पातळीवर भाजप नेतृ्त्व फार बारकाईनं लक्ष ठेवून असतं. सत्तेत असतानाही मंत्री वा बडे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते अशा सगळ्यांना झाडून पुसून कामाला लावले जाते. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपनं आता आपला पूर्ण फोकस हा स्थानिकच्या निवडणुकांवर केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी भाजप मंत्र्यांनाही संघटनात्मक पातळीवरील जबाबदारीची जाणीव करुन देताना कडक इशाराही दिला आहे.

आगामी महापालिका,जिल्हा परिषदा,पंचायत समिती या निवडणुकांच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील बैठकीनंतर भाजपच्या संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी मंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

भाजप (BJP) मंत्र्यांच्या बैठकीनंतर दुसरी मोठी घडामोडही मुंबईत पाहायला मिळाली. भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही अत्यंत महत्त्वाची मुंबईत पार पडली.या दोन्ही महत्त्वपूर्ण बैठकांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, संघाचे काही ज्येष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत महायुती सरकारमधील मंत्र्‍यांच्या कार्यपध्दतीवर नाराजीही व्यक्त केली आहे. यावेळी चव्हाण यांनी भाजप मंत्र्‍यांना तंबी दिली.ते म्हणाले,आपले सरकार असूनही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बऱ्याच ठिकाणी कामे वेळेत मार्गी लागताना दिसून येत नाही. कामाला विलंब होत असेल, तर ते योग्य नाही.प्रत्येक मंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची कामे लवकर होण्याच्या दृष्टीने नियोजन व्यवस्था करावी,अशा स्पष्ट सूचना चव्हाण यांनी दिल्या आहेत.

तसेच या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी भाजप मंत्र्यांना पक्षाकडे लक्ष द्या,तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे',असा इशाराही दिला आहे. त्यांनी भाजपच्या या बैठकीत पालकमंत्रिपद असलेल्या मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह होण्यास सांगितलं आहे.

भाजपमधील आपले इतरांसोबतचे मतभेद विसरुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना पक्षासाठी स्वतःला झोकून देत काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचदरम्यान,या बैठकीत भाजपच्या पालकमंत्र्यांना नागरिकांची कामं करण्यावर भर देण्याबाबतही सांगण्यात आले आहेत.

महापालिका निवडणूक सुमारे साडेतीन वर्षांपासून रखडली आहे. पुढील काही महिन्यांत ती होण्याची शक्यता आहे. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे टार्गेट भाजपने दिले होते. या निवडणुकीत लेखाजोखा महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट देताना तपासला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर भाजपने भरगच्च कार्यक्रमांची आखणी केली असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलंच कामाला लावले आहे. आता स्थानिकसाठी भाजपनं मंत्र्यांनाही अॅक्टिव्ह होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT