Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांनी राडा घातलेलं आमदार निवासातील कॅन्टीन फुकट बदनाम झालं... प्रशासनाकडून जेवणाला क्लिनचीट

Sanjay Gaikwad Canteen Case : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यंदाच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिले म्हणून कॅन्टीनमधीव कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Oct : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यंदाच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिले म्हणून कॅन्टीनमधीव कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.

हे प्रकरण राज्यभरात चांगलंच चर्चेत आलं. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अजिंठा केटरर्स या कॅन्टीनचा परवाना निलंबित केला होता. मात्र, अवघ्या महिनाभरातच ही कारवाई मागे घेण्यात आली आहे.

कॅन्टीनमध्ये कोणतेही अवैध खाद्यपदार्थ आढळून आलेले नाहीत, असं सांगत अन्न व औषध प्रशासनाने नावापुरतीच कारवाई केल्याचं आता समोर आले आहे. आमदार निवासच्या कॅन्टीनमधील अन्नपदार्थांवरून अनेकांनी तक्रारी नोंदवल्या होत्या.

Sanjay Gaikwad
Tukaram Munde News : 20 लाखांचे फर्निचर,75 हजारांचा शाॅवर; IAS तुकाराम मुंढेंचे 65 लाखांचे बीलं एका रात्रीत क्लिअर?

मात्र संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर कॅन्टीनमधील अन्नपदार्थांचा विषय राजकीय व प्रशासकीय वर्तुळामध्ये चर्चेत आला. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत विधानसभेतही चर्चाही झाली. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

अध्यक्षांच्या निर्देशानंतर अन्न व प्रशासन विभागाने तपासणीवेळी परवानाधारक कायद्यातील तरतुदींचे गंभीर उल्लंघन करून अन्न पदार्थ साठवणूक, अन्न पदार्थ तयार करणे व विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता हे सर्व आरोप अन्न व प्रशासन विभागाने मागे घेतले आहेत.

Sanjay Gaikwad
NCP Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'या' तीन जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली...

तर उपाहारगृहाने अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या आदेशांचं पालन केल्यामुळे त्यांना पुन्हा परवानगी दिल्याचं अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'आम्ही ज्या अन्नपदार्थांची तपासणी केली होती, त्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य निघाला. उपाहारगृहाला स्वच्छता ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाचं पालन उपाहारगृहाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा परवानगी देण्यात आली आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com