Ravindra Chavan News : विधानसभेतील बंपर यशानंतर भाजपने प्रदेश कार्याध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहे. डोबिंवली हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातोय. हा भाग ठाणे जिल्ह्यात येतो. डोंबिवलीच्या शेजारीच ठाणे आहे. तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना भाजपने प्रदेश कार्याध्यक्ष पद दिल्याच्या चर्चा होत्या. त्याला स्वतः चव्हाण यांनी 'साम टिव्ही'च्या मुलाखतीमध्ये उत्तर दिले.
'वर्षानुवर्ष मी भाजपच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. पण आमच्यात कधीच तिढा निर्माण झाला नाही. काम करताना आपले काय ध्येय आहे हे आम्हा दोघांनाही माहीत आहे. आमचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करत असतो. अनेक वर्ष आम्ही युतीत एकत्र काम केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये एकदा निर्णय झाला की आम्ही त्या दिशेने जाऊ.', असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? या विषयी चव्हाण यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, आम्ही लोकसभा एकत्र लढणार नाही त्यानंतर विधानसभा एकत्र लढणार नाही, अशा चर्चा होत्या.मात्र आम्ही महायुतीमध्ये एकत्र लढलो. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय त्या वेळाला घेण्यात येईल. भाजपचे वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील.
महायुती सरकारन थेट महिलांना आर्थिक लाभ देणारी लाडकी बहीण योजना राबवत आहे. त्याप्रमाणे अनेक योजनांमधून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यव्यस्थेवर होणार आहे. याबाबत रवींद्र चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, आर्थिक संकटात समतोल राखणं महत्त्वाचे असते या गोष्टींचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. त्यामुळे उत्पन्न वाढीतून यावर मात करता येते त्यासाठी आपलं उत्पन्न वन ट्रिलियनपर्यंत गेले पाहिजे. त्यामुळे या गोष्टींचा समतोल साधला जाऊ शकतो.
राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यावर भाजपचे आमदार सुरेश धस आरोप करत आहेत. त्यावर बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, माध्यमांनी सकारात्मक बातम्या देखील दाखवल्या पाहिजेत. ज्या लोकांची चूक आहे त्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की शासन करतील, असे चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.