Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी अपडेट; विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात; मोठे कारण आले समोर..

Vishnu Chate Latur jail: बीड जिल्हयातील मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करुन हत्या करण्यात आली होती.
Vishnu Chate | Santosh Deshmukh
Vishnu Chate | Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्हयातील मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून या प्रकरणात वेगाने घडामोडी घडत आहेत. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला व सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणांतील एक आरोपी फरार असून बाकी सर्वाना ताब्यात घेतले आहे. त्यातच आता या प्रकरणांतील आरोपी विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात करण्यात असल्याचे पुढे आले आहे. विष्णू चाटेला नक्की धोका कोणापासून आहे? हत्येतील सर्व आरोपींपासून विष्णू चाटेला वेगळे का ठेवण्यात येतंय? हा सवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, जयराम चाटे, महेश केदार या सहा जणांचा समावेश असल्याचे समोर आले होते. या सहा जणांनी मिळून संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारणाची चौकशी एसआयटी व सीआयडीकडून (CID) सुरु आहे.

Vishnu Chate | Santosh Deshmukh
Saif Ali Khan Attack : "एकाची हत्या आणि दुसऱ्याच्या..."; सैफवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचं CM फडणवीसांकडे बोट

दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सुरुवातीला विष्णू चाटेला ताब्यात घेतल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात आणि नंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी विष्णू चाटेने सुरुवातीला केज कोर्टात बीडऐवजी लातूर कारागृहात ठेवावे, यासाठी अर्ज केला होता. सुरुवातीला हा अर्ज केज न्यायालयाने (Kej Court) फेटाळला होता. मात्र, पुन्हा विष्णू चाटेच्या वकिलाने कोर्टाकडे विनंती केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी कोर्टाने मान्य केली. विष्णू चाटेला नक्की धोका कोणापासून आहे? हत्येतील सर्व आरोपींपासून विष्णू चाटेला वेगळे का ठेवण्यात येतंय? हा सवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Vishnu Chate | Santosh Deshmukh
Saif Ali Khan Attack : "एकाची हत्या आणि दुसऱ्याच्या..."; सैफवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचं CM फडणवीसांकडे बोट

आतापर्यंत विष्णू चाटे हा बीडच्या केज येथील कारागृहात होता. मात्र, त्याने आपली रवानगी लातूर कारागृहात करण्यात यावे, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. यासाठी त्याच्या वकिलाने कोर्टाला सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी करत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता न्यायालयाने हा अर्ज मान्य केला असून त्याची रवानगी लातूर कारागृहात केली आहे

Vishnu Chate | Santosh Deshmukh
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर चाकू हल्ला; काँग्रेस खासदार पोलिसांसह सरकावर भडकल्या, "कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे..."

दरम्यान, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत या 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आता या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटेला सुरक्षेच्या कारणास्तव लातूरच्या कारागृहात रवानगी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला देण्यात आलेली दोन दिवसांची कोठडी वाढवून 18 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.

Vishnu Chate | Santosh Deshmukh
Sharad Pawar Party leader allegations : बीडमधील गुन्हेगारीचा पॅटर्न तीन स्तंभांवर आधारलेला; शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याचे गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com