Aditya Thackeray, Ravindra Chavan Sarkarnama
मुंबई

Thackeray vs Bjp : भाजप मंत्र्याचा आदित्य ठाकरेंवर पलटवार; उद्घाटनाच्या श्रेयावरून उडाला धुरळा

Ravindra Chavan On Aaditya Thackeray Mankoli Bridge Dombivli : आदित्य ठाकरेंच्या आरोपांना भाजपच्या मंत्र्याने दिले प्रत्युत्तर...

शर्मिला वाळुंज

Maharashtra Politics Latest News : विकासकामांच्या श्रेयावरून आता ठाकरे गट आणि महायुतीत राजकारण रंगले आहे. यावरून सार्वजनिक बांधकाममंत्री आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री आणि नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

राज्यात एक पद्धत सुरू झाली आहे एखादा प्रकल्प पूर्ण झाला की त्याच्या श्रेयासाठी लढाई सुरू होते. यात आता आदित्य ठाकरेही यात उतरलेत. दिघा रेल्वे स्थानक, माणकोली उड्डाणपुलाचे उद्घाटन केले जाईल. त्याची त्यांनी चिंता करू नये. कुठल्या उद्घाटनासाठी किंवा श्रेयासाठी थांबणारे हे सरकार नाही, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

केडीएमसी आरोग्य विभागाने विकसित भारत संकल्प यात्रा सोमवारी काढली होती. भागशाळा मैदान येथे या यात्रेचे उद्घाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. महाराष्ट्रात 40 जोकरांची सर्कस सुरू असून ते सगळीकडे फिरत आहेत. ते काय काम करतात हे आपल्याला दिसत आहे. माणकोली उड्डाणपूल, दिघा रेल्वे स्थानक, उरण लाईन यांसारखी अनेक कामे पूर्ण होऊनही त्यांचे उद्घाटन केले जात नाही. उद्घाटनासाठी वेळ नाही म्हणून लोकांना त्रस्त ठेवले जात आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली होती.

मोठागाव-माणकोली पुलाला 2009 मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी शेवटच्या टप्प्यात त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. वित्तीय मान्यता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा मिळाली. त्यांच्याच कार्यकाळात काम सुरू झाले होते, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अडीच वर्षांत पाठी राहीलेला महाराष्ट्र 1 नंबरवर येण्यासाठी प्रत्येक विभाग आणि त्यांच्या योजनांवर सरकार लक्ष देत काम करत आहे. दिघा रेल्वे स्थानक, माणकोली उड्डाणपुलाचे उद्घाटन होईल. उद्घाटनासाठी हे सरकार थांबत नाही. काम पूर्ण झाले की त्या ठिकाणी ते खुले केले जाते. त्यामुळे त्याची चिंता करू नका. उद्घाटनासाठी, श्रेयासाठी थांबणारे हे सरकार नाही, असा टोला मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

Edited by Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT