Disha Salian Case : नितेश राणेंचा SIT वर आक्षेप; थेट आयुक्तांना लिहिले पत्र

Disha Salian Sit Probe Nitesh Rane Writes Letter To Mumbai Police : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नेमलेल्या एसआयटीतील चिमाजी आढाव यांना राणेंचा विरोध
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama

Disha Salian Case Sit : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी नेमली आहे. पण या एसआयटीवर आता भाजप नेते आमदार नितेश राणे सवाल उपस्थित केला आहे. एसआयटीत एका दोषी अधिकाऱ्याचा समावेश केल्याने ती बेकायदेशीर ठरली आहे, असे नितेश राणे यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Nitesh Rane
Lok Sabha Election: 'महाविकास आघाडी लोकसभेच्या 35 ते 40 जागा जिंकेल'; संजय राऊतांचा मोठा दावा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मालवणी पोलिस ठाण्याच्या आरोपी अधिकाऱ्यांनी थातुरमातूर तपास करून संगनमताने बनावट क्लोझर रिपोर्ट बनवून तो तत्कालीन ACP यांच्या मार्फत हा अपघात असल्याचे दाखवून प्रकरण बंद केले होते. त्यानंतर या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडून याप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली. त्या एसआयटीमध्ये चुकून मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांचाही समावेश करण्यात आला. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मालवणी पोलीस ठाण्याचे आधीचे दोषी अधिकारी यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळे त्या पोलीस ठाण्याचा कोणताही अधिकारी या प्रकरणाचा तपास करू शकत नाही. म्हणून चिमाजी आढाव हे एसआयटीचे सदस्य राहू शकत नाही. ते अपात्र असून एसआयटीमध्ये असल्याने ही एसआयटी बेकायदेशीर ठरली आहे. यामुळे चिमाजी आढाव यांना त्वरित एसआयटीमधून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आधीची मॅनेजर दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेच्या सहा दिवसांनंतर 14 जून 2020 मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतचाही संशयास्पद मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युसंबंधीचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत तो सीबीआयकडे दिला होता.

Nitesh Rane
Sanjay Raut On Salim Kutta : बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताला कोणत्या गृहमंत्र्याने पॅरोल दिला? राऊतांचं फडणवीसांकडे बोट!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com