Mumbai Political News : मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी निवडून आले आहेत. खासदार झाल्यानंतर वायकरांनी आठवड्यातच फेक एन्काउंटर आणि अँटेलिया प्रकरणातील आरोपी माजी पोलिस अधिकारी प्रदीप शार्माची भेट घेतली. शार्माच्या पीएसच्या कार्यालयात जाऊन वायकरांनी भेट घेतल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
रवींद्र वायकरांचा Ravindra Waikar देशात सर्वात कमी 48 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना पराभूत केले आहे. वायकरांना 4 लाख 52 हजार 644 तर कीर्तीकरांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळालेली आहे. खासदार झाल्यानंतर वायकरांनी प्रचारात सक्रिय असलेल्या प्रदीप शर्माची भेट घेतली आहे. शर्माने त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वायकरांचा प्रचार केला होता.
शर्माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राजकारणात आल्याचे स्पष्टपणे सांगत वायकरांसाठी मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत शर्माने वायकरांना मोठी मदत केल्याचेही दिसून आहे. यानंतर वायकरांनी शर्माची गुरुवारी त्याच्या पीएस या एनजीओ कार्यालयात जाऊन भेट घेतली.
प्रदीप शर्मा हा उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घातपाताच्या हेतूने उभा केलेल्या वाहनाचे मालक उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक आहे. त्याच्यावर 2006 मध्ये फेक एन्काउंटप्रकरणीही गुन्हा दाखल आहे. सध्या तो जामीनावर बाहेर असून राजकारणात नशिब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे वायकर आणि शर्मा यांच्या भेटील महत्त्व प्राप्त होते. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.