Anil Parab aditya thackeray sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : मुंबई उत्तर पश्चिममध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर, अनिल परबांनी निवडणूक अधिकाऱ्यांना ठरवलं खोटं

Roshan More

Shivsena UBT : शिंदे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभव स्वीकारावा लागला. यावर ठाकरे गटाकडून मोबाईलचा वापर करत ईव्हीएम फेरफार केल्याच्या आरोप केला होता. मोबाईलमुळे इव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नसल्याचा दावा निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी केला होता. मात्र, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणत हा विजय मिळवल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

अनिल परब यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना खोटं ठरवलं आहे. पोलिस आणि आरओ हे एकमेकांवर ढकलाढकली करत आहे, असे परब म्हटले आहे.

वायकरांच्या विजयाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचे आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी जाहीर केले तर, 19 व्या फेऱ्यापर्यंत मतमोजणीचे आकडे सांगितले जात नव्हते. सीसीटीव्ही फूटेज आम्हाला देण्यात आले नाही, असे अनिल परब यांनी सांगितले.

परब Anil Parab म्हणाले, आयोगाची आणि आमच्या मतमोजणीत 650 मतांचा फरक आला आहे. आमची मतं 650 जास्त आहे. आम्ही वारंवार आक्षेप घेवूनही ऐकण्यात आले नाही. 21 व्या फेरीनंतर थेट आकडेवारीच जाहीर केली. वायकारांच्या मेव्हण्याच्या फोनचा वापर करण्यात आला. मतमोजणीवेळी अधिकारी कोणाशी बोलत होते? त्यांना कोणाचा फोन येत होतो. त्या अधिकाऱ्यांवर कोणते गुन्हे दाखल आहेत याचा देखील तपास होणे आवश्यक आहे.

मोबाईल बदलला

मतमोजणीच्या दहा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. वायकर यांच्या मेव्हणाचा मोबाईल बदलण्यात आला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. वायकर यांना लोकसभेत शपथ देण्यात येवू नये, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT