Laxman Hake | Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Laxman Hake : 'भुजबळांनी टायमिंग साधलं नाही, हंगामाची वेळ निघून गेली'; लक्ष्मण हाकेंचा टोला

Laxman Hake on Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टोलेबाजी केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ तथा ओबीसी नेते छगन भुजबळ महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज आहेत. नाराज छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रियासमोर आली आहे. 'हंगाम आणि वेळ बघून भुजबळांनी पेरणी करायला हवी होती. आता वेळ निघून गेली आहे', असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पंढरपूर इथं होते. त्यावेळी त्यांनी नाराज छगन भुजबळ यांच्यावर प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले, "हंगाम आणि वेळ बघून पेरणी करायची असते. आता वेळ निघून गेली आहे. लोकसभे पूर्वी छगन भुजबळ यांनी टायमिंग साधल असतं, तर 'दूध का दूध आणि पाणी का पाणी', असं महाराष्ट्रातील राजकारण झालं असतं. आम्ही ओबीसी बांधवांनी महायुतीला (Mahayuti) मतदान‌ केलं आहे. महायुतीच्या मानगुटीवर बसवून ओबीसीचे प्रश्न सोडवू, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला.

लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर आणि त्या कुटुंबियांची शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या भेटीवर देखील निशाणा साधला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. या हत्येचे समर्थन करणार नाही. पण शरद पवार आणि अजित पवार यांनी मुळशीमध्ये घडलेल्या घटनात जाऊन भेटायलवा हवं होते, असे टोला लगावला.

मुळशीमध्ये बिल्डर धमकावले जातात. रांजणगाव एमआयडीसीमध्ये काय सुरू आहे? मुळशी पॅटर्न चित्रपट येतो. काय सुरू आहे, पुण्यात? पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकारांवर काका-पुतणे का गप्प आहेत, असा सवाल हाके यांनी केला.

फडणवीस-भुजबळ भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत काय घडलं, यावर छगन भुजबळ यांनी माध्यमांना माहिती दिली. सामाजिक, राजकीय अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महाविजयामागे ओबीसींचे मोठे पाठबळ असल्याचे कबूल केले. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिल्याचे आभार मानले पाहिजे. ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी मला सुद्धा खूप आहे, आणि ते होऊ सुद्धा देणार नाही, असे आश्वासन फडणवीसांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

फडणवीस तोडगा काढणार

तसंच 'राज्यात जे सध्या काही सुरू आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी 8 ते 10 दिवस मागितले आहे. आपण पुन्हा भेटू. चांगला मार्ग काढू. मार्ग शोधून काढू. ओबीसी नेत्यांना साधक-बाधक चर्चा करू. शांततेने घेऊ या. मार्गावर सखोल चर्चा करू', असेही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT