Sanjay Raut : ठाकरे बंधूंची भेट, संजय राऊतांचं 'मोठं स्टेटमेंट'; '...ते महाराष्ट्राच्या शत्रूंबरोबर!'

Sanjay Raut Statement on Thackeray Brothers Meet : कौटुंबिक कार्यक्रमानिमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया.
Sanjay Raut | Raj Thackeray | Uddhav Thackeray
Sanjay Raut | Raj Thackeray | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कौटुंबिक सोहळ्यानिमित्ताने काल एकत्र आले होते. त्यावर महाराष्ट्राच्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ठाकरे बंधूंच्या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं स्टेटमेंट केलं आहे.

संजय राऊत म्हणाले, "ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, ही चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबरोबर आणि त्यांच्या परिवाराबरोबर मित्रत्वाचे नाते आहे. उद्धव ठाकरे पक्षाचे नेते, माझे भाऊ आहेत. हे भाऊ एकत्र आल्याचा आनंद आहे. ठाकरे परिवारावर महाराष्ट्राचे प्रेम आहे. ठाकरे कुटुंबांचे महाराष्ट्राशी एक नातं आहे. ठाकरेंकडे त्याच दृष्टीने मराठी माणूस पाहतो".

Sanjay Raut | Raj Thackeray | Uddhav Thackeray
Top 10 News : छगन भुजबळांच्या निशाण्यावर अजित पवार, प्रणित शिंदे अमित शाहांच्या विरोधात आक्रमक-वाचा महत्त्वाच्या घडामोडी

'राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे. ते पक्षाचे काम करताना भाजपबरोबर (BJP) आहेत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे आयडाॅल आहेत. आमच्या पक्षाचे तसे नाही. मोदी, फडणवीस, शाह हे महाराष्ट्राचे शूत्र आहेत. त्यांच्याबरोबर काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यात, मुंबई लुटण्यात, मराठी माणसांवर अन्याय करण्यात, शिवसेना फोडण्यात, या तिघांचा फार मोठा सहभाग आहे. अशा लोकांबरोबर जाणं हे महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल. आणि दुर्दैवानं राज ठाकरे अशा लोकांची भलावण करतात. त्यांच्याबरोबर राहतात. एकेकाळी आम्ही भाजपबरोबर राहिलो आहे. त्यावेळी राज ठाकरे देखील आमच्याबरोबर होते', असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut | Raj Thackeray | Uddhav Thackeray
Mahayuti Government : मंत्रालयातील दालनासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ; पालकमंत्रीपदावरून रुसवेफुगवे वाढले

कुटुंब एक असतं; संजय राऊत

'ठाकरे बंधूंमध्ये आता वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह आहेत. मात्र कुटुंब एकत्र असते. अजित पवार देखील शरद पवार यांना भेटतात. रोहित पवार देखील काका अजित पवारांना जाऊन भेटतात. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील बहीण-भाऊ एकत्र येतात. कोकणातील राणे देखील त्यांचा एक मुलगा इकडे-दुसरा तिकडे. पण कुटुंब एक असतं', असे संजय राऊत यांनी म्हटले.

राजकीय नजरेने सध्या पाहू नका

संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रवाह असतात. त्या प्रवाहांमध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही. उद्धव-राज हे दोघं भाऊ आहेत. त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल. परंतु कालचा लग्नसोहळा राजकीय विषय नव्हता. अनेकदा ते दोघं एकत्र आले आहेत. राजकीय नजरेने सध्या पाहू नका, असा सल्ला देखील दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com